वारंवार चक्कर येत असेल तर सावधान, जाणून घ्या ‘या’ आजारांची चिन्हे

पोलीसनामा ऑनलाइन – चक्कर येणे ही एक सामान्य समस्या आहे. जी जवळजवळ प्रत्येकास कधीतरी आली असेल किंवा येतही असेल. परंतु वारंवार चक्कर येत असल्यास काळजी घ्यावी, कारण ही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. आपले डोळे, मेंदू, कान, पाय आणि पाठीच्या मज्जातंतूंचा कोणताही भाग काम करणे थांबवतो तेव्हा चक्कर येण्यास सुरुवात होते. वेळीच याची लक्षणे जाणून घेतली पाहिजे, नाहीतर गंभीर आजार होऊ शकतात. वारंवार चक्कर येणे आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते आणि कोणत्या रोगांचे लक्षण असू शकते ते जाणून घेऊ..

१) ऑक्सिजन मेंदूत न पोहोचणे
मेंदूला ऑक्सिजनचा निरंतर पुरवठा आवश्यक असतो. तो कमी पडला तर ती चक्कर किंवा बेशुद्ध पडण्याचा समस्या उद्भवतात. आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांची तपासणी करुन घ्यावी.

२) पाण्याअभावी चक्कर येणे
बरेच लोक पाणी कमी पित असतात, यामुळे त्यांच्या शरीरात हळूहळू पाण्याची कमतरता दिसून येते. यामुळे चक्कर येऊ शकते. ही समस्या विशेषत: वृद्ध आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अधिक दिसून येते.

३) कानाच्या संसर्गामुळेही चक्कर येऊ शकते
कानात संक्रमण झाल्याने चक्कर येऊ शकते. ऐकण्याच्या आणि संतुलन राखण्याच्या आपल्या क्षमतेवर याचा परिणाम होतो आणि यामुळे बहुधा चक्कर येते. जास्त प्रमाणात औषधांचा सेवन केल्याने देखील चक्कर येऊ शकते.

वारंवार चक्कर येणे या आजारांचे लक्षण असू शकते, वारंवार चक्कर येणे हे बर्‍याच आजारांचे लक्षण असू शकते. जसे – तणाव, मायग्रेन, मज्जासंस्थेची समस्या, ब्रेन ट्यूमर किंवा कान ट्यूमर इ. म्हणूनच वारंवार चक्कर येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना दाखवा.