डायबिटीज, अल्सरसह अनेक आजारावर गुणकारी शेवगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अ‍ॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक फायदे असून यामुळे सूज दूर होते. शेवग्याच्या कोवळ्या पानांची व फुलांची आणि शेंगांची भाजी करतात. शेवगा हा निसर्गतःच उष्ण असून याचा वापर वात आणि सर्दी-कफ यांसारख्या विकारांवर होतो. शेवग्याच्या शेंगा, पानं, झाडाची मूळं यासर्वांमध्ये पोषक तत्व आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक असतात. त्यामुळे अनेक आजारांवर शेवगा गुणकारी ठरतो.

शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा वापर होतो. यामध्ये पालकच्या भाजीपेक्षा ३ पटींनी आयर्नचं प्रमाण असतं. शरीरातील रक्त कमी झालं असेल तर आहारात शेवग्याचा वापर फायदेशीर ठरतो. अल्सर, ट्यूमर, ब्लड प्रेशर यांसाठी लाभदायक शेवग्याची पानं शरीरातील ऊर्जेचा स्तर वाढविण्यासाठी मदत करतात. तसचे अल्सर ठिक करण्यासाठी, ट्यूमर रोखण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी, सूज कमी करण्यासठी आणि शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवगा फायदेशीर ठरतो. रक्त शुद्धीसाठी शेवग्याच्या पानांप्रमाणेच शेंगाही अत्यंत फायदेशीर ठरतात. यातील घटक शरीरात अ‍ॅन्टीबायोटिक एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचेच्या विविध समस्या दूर होतात. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा गुणकारी आहेत. यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो. तसेच पित्ताशयाचे कार्यही सुरळीत होते.

घशातील खवखव, कफ, सर्दी, श्वास घेताना त्रास होणं यांसारख्या समस्यांचा त्रास होत असेल तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यायल्यास हा त्रास कमी होतो. तसेच टीबी, ब्रोन्कायटीस, अस्थमा यांसारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उपाय म्हणून मदत करतात. शेवगा व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीनता भंडार आहे. हे डोळ्यांची दृष्टी वाढवून डोळ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल लेव्हल कमी होते.

Loading...
You might also like