Health Tips : अश्वगंधा सेवन करा आणि जबरदस्त ताकद मिळवा, सोबतच अनेक आजारांपासून मिळेल मुक्ती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   Health Tips : सध्या आयुर्वेदात सर्व आजारांवर उपचार शक्य आहेत. अनेक चमत्कारी औषधींमुळे हे शक्य आहे. असेच एक औषध आहे अश्वगंधा. अश्वगंधाचा उपाय शरीराला डोंगरासारखी मजबूती आणि घोड्यासारखी ताकद देऊ शकतो. परंतु अशा अनेक फायद्यांबाबत लोकांना माहिती नाही. अश्वगंधा सेवन करण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत सविस्तर जाणून घेवूयात.

अश्वगंधाचे फायदे

1. थायरॉइडची समस्या दूर करण्यात उपयोगी आहे.

2. नियमित वापराने मांसपेशी अतिशय मजबूत होतात. मेंदू आणि मांसपेशीमध्ये ताळमेळ रहातो.

3. मोतीबिंदू सारख्या आजारापासून मुक्ती मिळू शकते.

4. अश्वगंधाचे सेवन त्वचेच्या कर्करोगाला दूर ठेवते. तसेच निर्जिव आणि खराब त्वचेला पुन्हा चमक मिळूवन देण्यात मदत करते.

5. अश्वगंधी खोबरेल तेलात मिसळून केसांना लावल्यास कोणत्याही हेयर टॉनिकपेक्षा कमी नाही.

6. यातील अँटीऑक्सीडेंट आणि तणाव कमी करण्याच्या गुणांमुळे तणाव कमी होतो. शिवाय हृदयाच्या मांसपेशी मजबूत होतात. यासाठी हार्टपेशंटसाठी लाभादायक आहे.

7. याच्या अँटी बॅक्टेरियल गुणामुळे संसर्गाला दूर ठेवते.

8. अश्वगंधा वाटून पेस्ट बनवून जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते, इन्फेक्शनचा धोका राहात नाही.

अश्वगंधाचे साइड इफेक्ट

1. गरोदर महिलांसाठी धोकादायक आहे

2. नियमित औषध घेणारे रूग्ण तसेच डायबिटीज, हाय बीपी आणि इनसोम्निया अशा आजाराने ग्रस्त लोकांनी हे घेऊ नये.

3. अश्वगंधा तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य मात्रेतच घ्या. एक्सपर्ट केवळ 3 ते 4 ग्रॅम पावडर एका दिवसात घेण्याचा सल्ला देतात.

काही महत्वाच्या गोष्टी

1. इंस्टट ऊर्जा मिळवण्यासाठी अश्वगंधापेक्षा चांगला पर्याय अन्य नाही.

2. अश्वगंधा थेट रक्तावर काम करते. म्हणजे रक्ताचा फ्लो वाढवते.

3. स्मरणशक्ती, विचार करण्याची शक्ती वाढवते.

4. अनेक रोगांवर उपयोगी आहे.

5. हिवाळ्यात डॉक्टरांनी सांगितलेल्या मात्रेत अश्वगंधा घेतल्यास शरीरात उष्णता राहते.