वजन कमी करायचंय ? नाष्ट्यात खा पोहे, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि यासाठी तुम्हाला तुम्ही नाष्ट्या स्किप करत असाल तर असं अजिबात नका करू. कारण एक असा पदार्थ आहे जो तुम्ही नाष्ट्यात खाऊ शकता. तो म्हणजे आहे पोहे. होय याचे इतरही अनेक फायदे होतात. याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

1) वजन कमी होतं – पोह्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. एक वाटीत केवळ 206 कॅलरीज असतात. यामुळं वजन वाढत नाही. जे वजन कमी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी पोहे खूप लाभदायक आहेत.

2) पोषकघटकांचा समावेश – एक मोठी वाटी पोह्यात 75 टक्के कार्बोहायड्रेट, 8 टक्के प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी यांचं भरपूर प्रमाण असतं. यामुळं सुपरफूड म्हणूनही पोह्याकडं पाहिलं जातं. यात 76.9 टक्के कार्ब्स आणि 23 टक्के चरबीयुक्त पदार्थ असतात. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचं सेवन करू शकता.

3) शरीरात ऊर्ज वाढते – दिवसभरात काम केल्यानं खूप थकवा आणि ताण येतो. जर तुम्ही नाष्यात पोहे खाल्ले तर यापासून बचाव होऊ शकतो. यानं शरीराल खूप ऊर्जा मिळते. पोह्यांसोबत तुम्ही सोयाबिन, सुकामेवा, अंडी खाल्लीत तर जास्त फायदा मिळतो.

4) भूकेवर नियंत्रण – पोहे पचायला हलके असतात. यामुळं पोट लवकर भरतं. म्हणून तुम्हाला लवकर भूक लागत नाही.

5) पचनक्रिया सुधारते – पोहे पचायला हलके असल्यानं यामुळं पचनशक्ती वाढण्यास मदत होते. पचन चांगलं झालं तर वजन आटोक्यत राहण्यास मदत होते.

6) रक्तातील साखर आटोक्यात राहते – पोह्यात असणाऱ्या फायबर आणि आयर्नमुळं रक्तातील साखर वाढण्यास अटकाव होतो. त्यामुळं रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. वजन आटोक्यात ठेवण्यासही याचा फायदा होतो.