सर्व ऋतूत ’हे’ 7 सोपे उपाय करून सर्दी, खोकल्याला ठेवा दूर, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना काळ सुरू असल्याने साधा सर्दी, खोकला, कफ झाला तरी लोकांच्या मनात शंका उत्पन्न होत आहे. शिवाय, अशा सामान्य आजारांकडे दुर्लक्ष करणे सुद्धा महागात पडू शकते. यासाठी सर्दी, खोकल्यासारखे आजार होऊच नयेत यासाठी काळजी घेणे खुप महत्वाचे आहे. काही घरगुती उपाय केल्यास आराम मिळवू शकता. हे उपाय जाणून घेवूयात…

हे आहेत उपाय

1 रात्री खोकला येत असेल तर स्वतःला हायड्रेट ठेवा. यामुळे म्युकस पातळ होईल आणि खोकला येणार नाही.

2 जेवणानंतर लगेचंच झोपू नका. यामुळे फॅटी एसिड अन्ननलिकेतून घशात परत येतात. त्यामुळे खोकल्याची समस्या वाढते. जेवल्यानंतर 2 तासांनी झोपा.

3 बेडरुमध्ये रुम फ्रेशनर किंवा स्प्रेचा वापर करू नका.

4 पोस्टनेसल ड्रिपची तक्रार असो किंवा एसिड रिफ्लक्सची तक्रार डोकं वर ठेवण्यासाठी उशीचा वापर करा.डोकं सपाट अवस्थेत असल्यास कफ एसिड रिफ्लेक्समुळे घश्यात समस्या उद्भवू शकते. डोक थोड्या उंचीवर असल्यास कफ जमा होण्याची स्थिती उद्भवत नाही.

5 झोपण्याआधी गरम पाण्यानं अंघोळ करा. अंथरूण स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. झोपण्याच्या जागेवर धूळ, माती असल्यास एलर्जीमुळे खोकला आणि शिंका येण्याची शक्यता असते. परंतु अस्थमामुळे खोकला येत असेल तर वाफेमुळे समस्या वाढण्याची शक्यता असते.

6 झोपण्याआधी गरम पाणी किंवा हळदीचं दुध, काढ्याचे सेवन करा. आलं, पुदिना टाकलेल्या चहाने खोकल्याची समस्या कमी होते.

7 धुम्रपान करू नका. यामुळे खोकल्याची समस्या कमी होते. नाक चोंदण्याची समस्या असल्यास नेजल स्प्रेचा वापर करा.