ऋतू कोणताही असो ‘सर्दी-खोकला’ दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे 9 घरगुती उपाय ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  ऋतू कोणताही असला तरीही अनेकांना सर्दी-खोकल्याची समस्या कायमच जाणवते. कधी कधी तर हे रोजचंच होऊन जातं. सध्या कोरोनाच्या काळात तर थोडा सर्दी खोकला आला तरी लोक घाबरतात. आज आपण यासाठी काही सोपे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. हे सोपे उपाय करूनही तुम्ही कायमच्या सर्दी खोकल्यापासून सुटका मिळवू शकता. काहींना रात्री खोकला येता. यावरही आपण उपाय जाणून घेणार आहोत.

1) तुम्हाला पोस्टनेसल ड्रिप किंवा अॅसिड रिफ्लक्सची तक्रार असेल तर डोकं वर ठेवण्यासाठी उशीचा वापर करायला हवा. जेव्हा तुमचं डोकं सपाट अवस्थेत असतं तेव्हा कफ अॅसिड रिफ्लेक्समुळं घश्यात समस्या जाणवू शकते. जर डोकं थोडं वर असेल तर अशी समस्या उद्भवत नाही.

2) झोपण्याआधी गरम पाण्यानं अंघोळ करा. परंतु हेही लक्षात ठेवा की, जर अस्थमामुळं खोकला येत असेल तर वाफेमुळं समस्या वाढू शकते.

3) झोपण्याआधी अंथरूण नीट स्वच्छ करून घ्या. कारण त्यावरील धुळीमुळंही खोकला आणि शिंका येण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा अंथरून धुवून घ्या. स्वच्छताही खूप महत्त्वाची आहे.

4) झोपण्याआधी गरम पाणी, हळदीचं दूध किंवा काढ्याचं सेवन करा. आलं, पुदीना असणारा चहा जर घेतला तर खोकल्याची समस्या कमी होऊ शकते.

5) धूम्रपान करत असाल तर हेही कारण आहे की, तुम्हाला खूप खोकला येतो. ही सवय सोडली तर खोकलाही दूर होईल.

6) जर तुमचं नाक चोंदलं असेल तर तुम्ही नेजल स्प्रेचाही वापर करू शकता. यामुळं नाक मोकळं होईल.

7) जर रात्री खोकला येत असेल तर स्वत:ला हायड्रेट ठेवा. यामुळं म्युकस पातळ होईल आणि खोकला येणार नाही.

8) जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर ही चूक करू नका. यामुळं फॅटी अॅसिड अन्ननलिकेतून घशात परत येतात. यामुळं खोकल्याची समस्या वाढते. जेवल्यानंतर 2 तासांनी झोपावं.

9) बेडरूममध्ये रूम फ्रेशनर किंवा स्प्रेचा वापर करू नका. काहींना यामुळंही शिंका येतात. काहींना याच्या अॅलर्जीची समस्या असते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.