‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं तुम्हाला देखील ‘सर्दी’ अन् ‘खोकला’ होण्याची भीती वाटते ? अशी काळजी घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यात बदलणाऱ्या हवामानामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवत असतात. त्यातच सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आजारी पडण्याची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. सर्दी, ताप, खोकला हे कोरोनाची लक्षण असल्याने यापैकी एकजरी लक्षण आपल्याला आढळून आले तरी लोक घाबरून जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांच्यामध्ये व्हिटामीन डी ची कमतरता भासू लागल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली आहे, असे एका रिसर्चमधून समोर आले आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या प्रसारात कोणत्याही आजाराची धास्ती न घेता घरगुती उपाय करुन तुम्ही या आजारांपासून स्वत:ला लांब ठेवू शकता. आज तुम्हाला सर्दी, खोकल्यापासून दूर राहण्याचे घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांनी तुम्ही स्वत:ला निरोगी ठेवू शकता. कारण खोकल्याकडे दुर्लक्ष केले तर मोठ्या आजाराला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे यावर वेळीच उपाय केले तर तुमच्या आरोग्याला धोका उद्भवणार नाही.

मध
नियमीतपणे दोन चमचे मध खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो. मधामध्ये अॅन्टी मायक्रोव्हियल गुण असल्यानं यामुळे संसर्ग पसरवणाऱ्या जिवाणूंचाही खात्मा होतो. तुम्ही दुधात मध घालून याचे सेवन करु शकता. मधामध्ये मुबलक प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल, अॅन्टी ऑक्सिडंट आणि अँन्टी फंगल गुणधर्म असतात आणि दूधामध्ये कॅल्शियम असते. तसेच दूधामध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि डी, प्रोटीन आणि लॅक्टिक अॅसिडदेखील मुबलक प्रमाणात असते. जे शरीरात कॅल्शियमची करतरता भासू देत नाही. हाडं आणि दातांच्या मजबुतीसाठी हे फायदेशीर ठरतं.

काळी मिरी
जर तुम्हाला खोकल्याचा त्रास होत असेल, तर काळी मिरी आणि खडीसाखर योग्य प्रमाणात वाटून घ्या. त्यामध्ये तूप घालून त्याच्या लहान गोळ्या तयार करुन घ्या. या गोळ्या दिवसातून तीन ते चार वेळा चोखल्यास, तुमचा कफ असलेला खोकला निघून जाण्यास मदत होते.

हळद
सर्दी, खोकला आणि घशात होत असलेल्या खवखवीसाठी हळदीचं दूध उत्तम ठरत असतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीर चांगले राहते. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते. शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. एवढेच नाहीतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.

तुळस
तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खाल्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यासारख्या समस्या दूर होतात. तुलशीच्या पानांचा अर्कात मध एकत्र करुन प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक बॉन्कायटिस, अस्थमा यासारख्या श्वसाशी निगडीत आजारांवर ही हे फादेशीर ठरते. सर्वप्रथम दीड ग्लास दूध उकळून घ्या. त्यामध्ये 8 ते 10 तुळीशीची पानं घाला. पाहिजे असल्यात या दुधात हळत किंवा मध ही घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची किंवा खोकल्याची समस्या दूर होते.