असं तयार करा तुळशीचं दुध, ‘या’ 12 समस्यांवर ‘रामबाण’, इतर फायदे वाचून व्हाल अवाक

कोरोनाला तोंड देण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक असल्याचे आता सर्वांनाच कळून चुकले आहे. यामुळे लोक विविध घरगुती उपाय करून आपली काळजी घेत आहेत. निरोगी राहण्यासाठी केवळ दूध पिण्यापेक्षा तुळशीचे दूध जास्त लाभदायक ठरते. हे दूध कसे तयार करायचे आणि त्याचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे
1 शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे समस्यांपासून बचाव होतो.
2 लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी उपयोगी.
3 शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होते.
4 तणाव कमी होण्यास मदत होते.
5 तुळस कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते.
6 हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
7 हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.
8 वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यासाठी मदत होते.
9 तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खाल्ल्याने ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला दूर होतो.
10 तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते.
11 क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाच्या आजारांवर फायदेशीर.
12 तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची समस्या दूर होते.

असं तयार करा तुळशीचं दूध
दिड ग्लास दूध उकळवा. उकळलेल्या दुधात 8 ते 10 तुळशीची पाने टाका. या दुधात हळद किंवा मध घालू सुद्धा घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like