अशी वाढवा रोगप्रतिकारकशक्ती ! घरच्याघरी रोज प्या ’हा’ काढा

पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. त्यातच देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर हे या काळात खुप महत्वाचे आहेच, पण तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे सुद्धा खुप आवश्यक आहे. कारण, ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांना कोरोनाची लागण लवकर होत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक काढा सांगितला असून तो बनवण्याची पद्धत खुपच सोपी आहे, घरच्याघरी हा काढ कसा बनवायचा ते पाहुयात…

असा तयार करा काढा

कृती
7 ते 8 तुळशीची पाने, दालचीनी, सुंठ, काळी मिरी यांची पावडर तयार करून त्यापासून गोळे तयार करा. 150 मिली पाण्यात उकळून घ्या त्यात टी बॅग 7 ते 8 वेळा घाला, दिवसातून एक ते दोनवेळा या पाण्याचे सेवन करा.

हे लक्षात ठेवा
1 पित्ताचा त्रास असल्याास वारंवार आणि खूप उकळलेला, आलं, गवती चहा टाकलेला चहा पिऊ नका. जिभेला फोड येणे, घशात आग होणे, अस त्रास होऊ शकतो. अशा लोकांना गरम चहा प्यायला तरी त्रास होतो. त्यामुळे दिवसांतून दोनच वेळा काढ्याचे किंवा आयुर्वेदिक चहाचे सेवन करा.