डोळ्यांना वेळावेळी सूज येणं ‘या’ गंभीर आजाराचं असू शकतं लक्षणं, घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – शरीरास प्रोटिन्सची कमतरता भासल्यास अनेक आजार उद्भवू शकतात. मूत्रामार्फत प्रथिने जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडल्यास प्रोटिन्सची कमतरता भासते. या समस्येला नेफ्रोटिक सिंड्रोम असे म्हटले जाते. नेफ्रोटिक सिंड्रोममुळे पाय आणि टाचा सुजतात आणि इतरही समस्या दिसतात. २ ते ६ वर्षांतील लहान मुलांच्यात जास्त प्रमाणात ही समस्या आढळून येते. तसेच मोठ्यांना सुद्धा या समस्येचा सामना करावा लागतो.

हा आजार उद्भवल्यास किडनी चाळणीसारखी काम करते. अर्थात शरीरामधील विषारी आणि नको असलेले घटक बाहेर टाकण्यासोबतच आवश्यक असलेले प्रोटिन्सही शरीराबाहेर पडू लागतात. तथापि, शारीरिक समस्या निर्माण होतात. लवकर या समस्येकडे लक्ष देऊन तपासणी केली नाही तर नेफ्रोटिक सिंड्रोम वाढतात. लघवीच्या द्वारे प्रथिने शरीराबाहेर टाकले जातात. त्यात डोळे आणि पोटास सूज येते. किडनीतील लहान वाहिका ज्या गाळण्याचे काम करतात. त्या खराब होतात. जर वेळीच उपचार घेतले नाही तर नेफ्रोटिक सिंड्रोम हा आजार दीर्घकाळ राहू शकतो.

लक्षणे
१.
पोट दुखणे

२. उच्च रक्तदाब

३. भूक कमी लागणे

४. सतत लघवी होणे

तुमच्यातील लहान मुलांत वरील लक्षणे दिसत असतील तर तात्काळ तपासणी करा. जर नेफ्रोटिक सिंड्रोमचं कोणतेही लक्षणे आढळून आले असतील तर लघवीतली प्रोटिन्सची तपासणी करा. २४ तासांत लघवीची तपासणी करण्यास सांगितले जाते. तपासणीत लघवीतील प्रोटीन्सचे प्रमाण किती याबाबत माहिती मिळते. या आजाराच्या निदानासाठी रक्ताची तपासणी देखील करण्यात येते.

त्याच प्रमाणे किडनीच्या पेशींचा छोटा नमुना घेऊन डॉक्टर बायोप्सीद्वारे या आजाराची तपासणी करतात. बायोप्सीमध्ये त्वचेतून किडनीत विशेष सुई टाकण्यात येते तिच्या साहाय्याने किडनीच्या पेशी घेण्यात येतात आणि मग त्यांना लॅबमध्ये पाठवले जाते. त्यामध्ये रक्तातील प्रथिनांची पातळी योग्य आहे की नाही ते तपासण्यात येते. जर त्यात प्रथिनांची पातळी कमी असेल तर आणि त्यासोबत प्रमाण पाहिले तर नेफ्रोटिक सिंड्रोमचे योग्य निदान करणे शक्य होते. हा आजार उद्भवण्यापूर्वीच लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे.