Health tips | शरीरात दिसणार्‍या 15 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ‘या’ 9 पोषकतत्वांच्या कमतरतेचे असू शकतात ‘संकेत’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या सर्व अवयवयांच्या चांगल्या कामासाठी योग्य मात्रेत पोषकतत्वांची आवश्यकता असते. पोषकतत्व खाण्या-पिण्यातून मिळतात. व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शियम इत्यादी पोषकतत्व असतात. याच्या कमतरतेने (nutrition deficiency) इम्यून सिस्टम कमजोर होऊ शकते आणि गंभीर आजार होऊ शकतात. पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे (nutrition deficiency and symptoms) शरीरात कोणत्या समस्या होतात आणि यावर कोणते उपाय आहेत ते जाणून घेवूयात… Health Tips nutrition deficiency symptoms here are 15 sign and symptoms of vitamins and iron deficiency

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

– Vitamin-C
हिरड्यांतून रक्त येणे, सांधेदुखी, निस्तेज त्वचा हे व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेचे लक्षण आहे. यासाठी आवळा, लिंबू, संत्रे आणि पेरू सेवन करा.

– iron
त्वचा पिवळी पडणे, सतत थकवा, डोकेदुखी, डोके जड होणे, नखे आणि ओठ पांढरे पडणे, हे शरीरात आयर्न आणि हिमोग्लोबिनच्या कमरतेमुळे रक्त कमी झाल्याचे लक्षण आहे. यासाठी नट्स, सीड्स, पालक, बिन्स, अंडे इत्यादीचे सेवन करा.

– calcium
कमजोर दात, नखे आणि हाडे हे कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण आहे.
यासाठी दूध, दही, पनीर, ब्रोकली, पालक, भेंडी, सुकलेले अंजीर सेवन करावे.

– Vitamin-D
सतत आजारी पडणे, डिप्रेशन, अंगदुखी, कमजोर हाडे हे व्हिटॅमिन-डी च्या कमतरतेचे लक्षण आहे.
कोवळ्या उन्हात थांबा. दूध, मशरूम, पनीर, आणि मासे सेवन करा.

– Vitamin B-12
शरीर पिवळे पडणे, रक्ताची कमतरता हे व्हिटॅमिन बी-12 चे लक्षण आहे.
यासाठी दूध, दही, अंडा, चिकन आणि मासे सेवन करा.

– Vitamin B7
बायोटिन म्हणजे व्हिटॅमिन बी 7 कमतरतेमुळे कोरडे केस, कोरडी त्वचा, केस गळणे, निद्रानाश अशी लक्षणे दिसतात.
यासाठी काजू, बदाम, टोमॅटो, आक्रोड, गाजर, पालक सेवन करा.

– Vitamin-E
व्हिटॅमिन-ई च्या कमतरतेमुळे मांसपेशींमध्ये कमजोरी, अंगदुखीसारखी लक्षणे दिसतात.
यासाठी बी, बदाम, जैतून आणि पालक सेवन करा.

– Vitamin – A
व्हिटॅमिन – ए ची कमतरता होणे खुप दुर्मिळ असते परंतु यामुळे डोळ्यात पांढरे डाग, रात्री कमी दिसणे, इत्यादी लक्षणे असू शकतात.
यासाठी बीट, गाजर, ब्रोकली, पालकचे सेवन करा.

Web Title : Health Tips nutrition deficiency symptoms here are 15 sign and symptoms of vitamins and iron deficiency

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

हे देखील वाचा

Indian Railways | रेल्वेने केला विक्रम, जूनमध्ये 112.65 मिलियन टन मालाची केली वाहतूक