Health Tips | जेवल्यानंतर ताबडतोब झोपण्याची सवय आहे का? मग व्हा सावध! होऊ शकतात हे गंभीर आजार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | रात्री उशिरा जेवणे, जास्त जड खाणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे या सवयी लठ्ठपणासह अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. अन्न खाण्याची योग्य पद्धत देखील तेवढीच महत्त्वाची आहे जेवढे योग्य खाणे. (Health Tips)

 

जर तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल, तर हेच तुमच्या अनेक आजारांचे कारण आहे. कारण तुम्ही योग्य आहार घेत असाल परंतु आहार घेण्याची वेळ किंवा घेतल्यानंतरची क्रिया योग्य नसेल तर हे अन्न फायद्यापेक्षा नुकसान जास्त करेल. त्यामुळे यात सुधारणा करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

 

ही समस्या नवीन नाही, तुम्ही यापूर्वी अनेक याबद्दल ऐकले असेल तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एवढेच नाही तर दिवसा जेवल्यानंतर झोपत असाल तर ही सवय बदला. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर कोणते आजार होऊ शकतात जाणून घेवूयात. (Health Tips)

 

1. रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Levels) :
जेवल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर साखर शरीरात वापरली जात नाही आणि जास्त साखर रक्तात विरघळू लागते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. यामुळे वजन वाढतेच, शिवाय अनेक आजारही होतात.

2. अपचन (Indigestion) :
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील बहुतेक अवयव स्थिर होतात आणि शरीराच्या पचनासह अनेक कार्ये मंदावतात. यामुळे तुमचे अन्न नीट पचत नाही. यामुळे जे लोक जेवल्यानंतर झोपी जातात, त्यांना उठल्यानंतरही पोट भरलेले वाटते. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

 

3. लठ्ठपणा (Obesity) :
रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते.
याशिवाय अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोप लागल्याने शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो.
याशिवाय झोप आणि आरोग्य या दोन्हींवर परिणाम होतो. जेवल्यानंतर किमान 2 तास झोपू नका.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | problem may serious due to sleeping immediately after eating food you should know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Daibetes – Milk | डायबिटीजमध्ये दूध प्यायल्याने रुग्णांची ब्लड शुगर वाढू शकते का? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Care | हिवाळ्यात मुलांची घ्या विशेष काळजी, जाणून घ्या कसे ठेवावे गरम आणि आजारांपासून सुरक्षित

Diwali 2022 | पुणेकरांनो बिनधास्त तोडा वाहतुकीचे नियम, दिवाळीत 10 दिवस कोणतंही चलान नाही, पालकमंत्र्यांनी दिली माहिती