अपचनामुळे आंबट ढेकर येतात का ?, ’हे’ 9 सोपे घरगुती उपाय करा, समस्या होईल दूर

चुकीची जीवनशैली तसेच सध्या कोरोना काळात शरीराची कमी झालेली हालचाल यामुळे पोट साफ न होणे, अपचन, आंबट ढेकर येणे या समस्या वारंवार होत आहेत. जास्त हेवी खाल्ल्याने पोटाच्या समस्या वाढतात. ढेकर येताना अ‍ॅसिडीक द्रवपदार्थ घशात आल्यास आंबट येणं असं म्हणतात. कडवट, आंबट द्रवपदार्थ घशातून आल्यास त्रास होतो. तसेच घसा, पोट आणि छातीत जळजळ होते. आंबट, कडवट ढेकर येण्याच्या समस्येवरील उपाय जाणून घेवूयात…

हे उपाय करा

1 एकत्र जास्त खाण्यापेक्षा थोड्याथोड्या वेळाने काहीतरी खात राहा. तीव्रतेने भूक लागल्यानंतर काही खाता तेव्हा 5 ते 10 मिनिटांनंतर लगेच ढेकर येतो. म्हणून ढेकर आल्यानंतर 30 मिनिटे ब्रेक घेतल्यानंतर खायला हवं.

2 वेलची घालून चहा प्या.

3 बडीशेपचे सेवन करा. बडीशेपचा रस आणि गुलाबजलात समप्रमाणात मिसळून प्यायल्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते.

4 कोंथिबीरीची दांडी चावून खाल्यास ढेकर येणं थांबतं.

5 सोडा प्यायल्याने पोटातील गॅस बाहेर पडतो.

6 लवंग किंवा आल्याचा तुकडा चोखा.

7 जेवणाच्या वेळ चुकवू नका, रात्री उशीरा जेवणं टाळा.

8 थंड दूध प्या.

9 डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या.