Winter Superfoods : वाढेल इम्युनिटी आणि बुद्धी ! जाणून घ्या पालक खाण्याचे 10 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी खूप लाभदायक मानल्या जातात, विशेषत: पालकला सुपरफूड म्हटले जाते. यामध्ये कॅलरी कमी आणि पोषकतत्त्व भरपूर असतात. पालकात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्न आढळते, यासाठी त्वचा, केस आणि हाडांसाठी खूप उपयोगी मानले जाते. याशिवाय काही गंभीर आजरांनासुद्धा हे नियंत्रणात ठेवते. पालक खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात –

इम्युनिटी वाढते –
रोज एक कप पालक खाल्ल्याने इम्युनिटी मजबूत होते आणि शरीर पूर्णवेळ अ‍ॅक्टिव्ह राहाते.

हायब्लडप्रेशर नियंत्रणात राहाते –
पालकात पोटेशियम भरपूर असल्याने हायब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

कॅन्सरला रोखतो –
पालकात भरपूर प्रमाणात जेक्सँथिन आणि कॅरोटीनॉयड आढळते, जे शरीरातून फ्री रॅडिकल्स बाहेर काढते. यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना रोखता येते.

हाडे मजूबत होतात –
पालकात व्हिटॅमिन के असते जे हाडांसाठी लाभदायक असते. एक कप पालकात 250 मिली ग्रॅम कॅल्शियम आढळते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.

डोळ्यांसाठी चांगले –
पालकात अँटीऑक्सीडंट आणि व्हिटॅमिन ए असते, ज्यामुळे डोळे निरोगी राहतात.

वजन कमी होते –
पालकात कमी प्रमाणात कॅलरी आणि भरपूर फायबर असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, लवकर भूक लागत नाही. यामुळे वजन नियंत्रणात राहाते.

बॉडी रिलॅक्स ठेवतो –
पालक मेंदू शांत ठेवतो, तणावमुक्त राहण्यास मदत करतो. यातील झिंक आणि मॅग्नेशियम अनेक मानसिक आजारांना बरे करते. चांगली झोप येते.

स्मरणशक्ती वाढते –
यातील व्हिटॅमिन के मुळे नर्व्हस सिस्टम मजूबत होते आणि मेंदू अ‍ॅक्टिव्ह राहतो. स्मरणशक्ती वाढते.

हृदयरोगांना रोखतो –
धमण्यांमध्ये चरबी जमल्याने स्ट्रोक आणि एथेरोस्क्लेरोसिसचा धोका वाढतो. पालकातील ल्यूटिन धमण्यांना मोठ्या होण्यापासून वाचवते, ज्यामुळे हृदयाचे आजार होत नाहीत.

मुरमांपासून दिलासा –
पालक त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. शरीराची सूज कमी होते. मुरमांची समस्या होत नाही आणि त्वचा चमकदार बनते. पालकाचा फेसपॅकसुद्धा परिणामकारक ठरतो. पालकाची पेस्ट बनवून फेस मास्कप्रमाणे लावा आणि 20 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे डाग दूर होतात.