Health Tips | फळांवर मीठ टाकणे आरोग्याच्या दृष्टीने पडू शकते महागात, खाल्ल्याने होऊ शकते नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – फळे आरोग्यासाठी फायदेशीर (Health Tips) असतात. आंबट-गोड फळे चवीला चांगली असतात. लोकांना वेगवेगळ्या प्रकारे फळे खायला आवडतात. काहीजण मीठ घालून फळे खातात तर काही रस बनवून. फळांचे छोटे तुकडे करून त्यावर मीठ टाकून ते चवीने खाल्ले जातात, पण असे केल्याने आरोग्याची (Health Tips) हानी होऊ शकते. फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात (Salted Fruits Side Effects).

 

१. हाय सोडियम
फळांवर मीठ टाकून खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते. अशा प्रकारे मीठ खाल्ल्याने मिठाचे प्रमाण वाढू शकते. अतिरिक्त सोडियममुळे रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

 

२. किडनीची समस्या
जास्त मीठ खाणे किडनीसाठी अजिबात चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनीमध्ये समस्या निर्माण होतात. आपल्याला किडनीचा आजार असला तरी आपण काही फळे खातो, त्यात मीठ टाकून खाल्ल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. किडनीचे आजार असल्यास अन्नातील मिठाचे प्रमाणही कमी करावे. (Health Tips)

३. ब्लोटगची समस्या
जास्त सोडियममुळे शरीरात वॉटर रिटेंशनचा धोका वाढतो. त्यामुळे पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. जास्त सोडियममुळे, शरीर डिटॉक्स होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

 

४. न्यूट्रिएंटसची कमतरता
फळावर मिठ टाकून खाल्ल्याने फळातील संपूर्ण पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत.
मीठ टाकल्याने फळांमधून पाणी बाहेर येते आणि काही प्रमाणात पोषणही कमी होते.
जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण योग्य प्रकारे होत नाही.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | salted fruits side effects on health kidney disease

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल