जाणून घ्या हृदयकविकार टाळण्यासाठी ‘या’ खास 8 टीप्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेकजण हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. हृदयरोगांना जर दूर ठेवायचं असेल तर व्यसनांपासून दूर राहणंही महत्त्वाचं आहे. हृदयरोविकाराला दूर ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती आपण घेणार आहोत.

हृदयविकार टाळण्यासाठी काही खास टीप्स –

1) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं हृदयाच्या धमण्यांवर परिणाम होतो. त्यामुळं धूम्रपान आणि मद्यपानाचं सेवन करणं टाळावं.

2) नियमित व्यायाम करा.

3) सायक्लिंग, चालणं, धावणं अशा प्रकारचे व्यायाम करा.

4) योगा करा.

5) योग्य आणि सकस आहार घ्या.

6) सतत एका जागी बसून काम केल्यास त्यामुळं स्थूलता किंवा लठ्ठपणा येतो. याचा परिणाम अनेकदा हृदयावर होतो.

7) शक्यतो शाकाहारी जेवण करण्यावर भर द्या.

8) कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.