डाएटमध्ये समावेश करा या खाण्या-पिण्याच्या ‘या’ 7 गोष्टी, येईल चांगली आणि भरपूर झोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली झोप खुप आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यास शरीर अनेक आजारांपासून दूर राहाते. मेंदू योग्य प्रकारे काम करतो. प्रत्येकाने 7 ते 9 तासांची झोप घेणे गरजेचे आहे. परंतु, अनेक लोक चांगली झोप घेऊ शकत नाहीत, ज्यामुळे त्यांची सर्व सिस्टम बिघडते. चांगली झोप हवी असेल तर डाएटमध्ये काही बदल करावेत. कोणत्या वस्तू सेवन केल्यास चांगली झोप येऊ शकते ते जाणून घेवूयात…

1 बादाम

झोपण्यापूर्वी सुमारे 28 ग्रॅम बदाम खा. यामुळे चांगली झोप लागते. डायबिटीज, हृदयरोग, सूज, तणाव, कोर्टिसोल हार्मोनचा स्तर नियंत्रित ठेवणे इत्यादीमध्ये लाभादायक आहे.

2 कीवी

चांगल्या झोपेसाठी नियमित मध्यम आकाराची एक ते दोन कीवी खावीत. यामुळे पचनशक्ती, सूज, कोलेस्ट्रॉल इत्यादीमध्ये फायदा होतो.

3 फॅटी फिश

साल्मन, टूना, ट्राउट आणि मॅकेरल यासारखे मासे खाल्ल्याने झोप चांगली लागते. शिवाय, हृदरोग, सेरोटोनिन हार्मोन यावर लाभदायक आहे.

4 अक्रोड

चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी योग्य प्रमाणात अक्रोड खा. पचनशक्ती, कोलेस्ट्रॉलचा स्तर, इत्यादीसाठी लाभदायक आहे.

5 सफेद तांदूळ

झोपण्याच्या एक तास अगोदर सफेद तांदळाचा भात खाल्ल्याने झोपेची समस्या दूर होते.

6 टार्ट चेरी ज्यूस

टार्ट चेरी ज्यूस सेवन केल्याने चांगली झोप येते. या ज्यूसमुळे इनसोम्नियाच्या समस्येत आराम मिळतो.

7 कॅमोमाइल चहा

चांगली झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी कॅमोमाइल चहा प्या. कँसर, हृदयरोग, इम्यून सिस्टम, इत्यादीसाठी देखील हा चहा लाभदायक आहे.

You might also like