Health Tips : ‘हे’ 5 भारतीय नाश्ते आहेत विदेशी जंक फूड्सपेक्षा सुद्धा जास्त धोकादायक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जेव्हा भारतीय आहर आणि परदेशी आहाराबाबत बोलले जाते, तेव्हा पाश्चिमात्य आहारापेक्षा जास्त हेल्दी आणि बॅलन्स भारतीय आहार मानला जातो. कारण भारतीय खाण्यात डाळ, भाजी, धान्य, सुकामेवा, गुळ, लोणचे इत्यादीचा वापर केला जातो. परंतु, जेव्हा भारतातील लोकप्रिय नाश्त्याबाबत चर्चा होते तेव्हा तो आरोग्यदायी आहे, असे ठामपणे म्हणता येत नाही. अनहेल्दी नाश्ता म्हटले की पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंक, चाउमीन, नूडल्स इत्यादी नावे घेतली जातात, पण इंडियन स्नॅक्ससुद्धा असे आहेत जे शरीराला जंक फूड्सपेक्षा सुद्धा जास्त हानीकारक ठरू शकतात. असे कोणते भारतीय नाश्त्यातील पदार्थ आहेत जे धोकादायक आहेत ते जाणून घेवूयात…

1 समोसा, पुरी, कचोरी
समोसाशिवाय भारतीय स्नॅक पूर्णच होऊ शकत नाही. समोसा हा इराणमधून भारतात आला असला, तरी बहुतांश भागांमध्ये तो लोकप्रिय आहे. समोसा हा एक तळलेला नाश्ता आहे, ज्याचा वरचा थर मैद्याच्या पीठाने बनविला जातो आणि स्टफिंग बटाट्याने केले जाते. बटाटा आणि मैदा हे दोन्ही आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. मैद्यात जास्त प्रमाणात फॅट असते आणि यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते. तसेच पुरी आणि कचोरी जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच, याच्या सेवनाने लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, स्ट्रोक, कर्करोग, हृदयविकाराचा झटका अशा समस्या देखील उद्भवू शकतात.

2 पाणी-पुरी (गोलगप्पा)
गोलगप्पा किंवा पाणी-पुरी भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. भारताच्या प्रत्येक भागात हे गोलगप्पा सापडतील. गोलगप्पा खाण्यास चवदार असतात. कारण त्यात बटाटे, मटार आणि आंबट-मसालेदार पाणी मिसळले जाते, परंतु गोलगप्पाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. गोलगप्पाचे दीर्घकाळ सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. कारण तेही तळलेले असतात.

3 भजी
भजी आणि भजीसारखे इतर स्नॅक्स जे बसेनपीठात भाज्या मिक्स करून बनवले जातात, ते भारतीयांच्या खुपच आवडीचे आहेत. भजी तेलात तळलेले असल्याने आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. घरी बनवलेले भजी तुम्ही अधूनमधून खाऊ शकता. परंतु हे जास्त खाणे, किंवा बाहेरून मीठाईच्या दुकानातून आणून खाणे खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कर्करोग यासारखे अनेक आजार होऊ शकतात.

4 छोले भटुरे
छोले भटुरे हे उत्तर भारतातील विशेषत: पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, एमपी मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. यातील प्रोटीनयुक्त असतात, ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु छोले बनवण्यासाठी जास्त मीठ, मसाले आणि तेल वापरले जाते, म्हणून ते जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. याशिवाय भटूरे मैदाच्या पीठाचे बनवून डिप फ्राय केले जातात. यासाठी ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉलची समस्या, हृदयाची समस्या इत्यादी आजार होऊ शकतात.

5 टिक्की
टिक्की हा पाणीपुरीच्या स्टॉलवर मिळाणारा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. उकडलेले बटाटे तेलात डिप फ्राय करून हा पदार्थ बनवला जातो. टिक्कीचे नियमित सेवन करणे धोकादायक ठरू शकते कारण त्यात भरपूरप्रमाणात कार्बोहायड्रेट, स्टार्च, फॅट आणि कोलेस्टेरॉल आहे. जे आपल्या शरीरासाठी तसेच हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकते. जास्त तेल, मिरची आणि मीठ वापरल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.