‘कोरोना’ संसर्गापासून वाचण्यासाठी जाणून घ्या फळं आणि भाज्या धुण्याची योग्य पद्धत, ‘या’ 4 नियमांचे करा पालन

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना काळात लोक खुप काळजी घेत आहेत. पण, बाहेरून आणलेली भाजी आणि फळं कशाप्रकारे स्वच्छ करावी, याबाबत अजूनही संभ्रम दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबतीत काही नियम आणि पद्धती सांगितल्या आहेत. कारण भाज्या आणि फळं आपल्यापर्यंत येईपर्यंत त्यांना अनेक हात लागलेले असतात. याद्वारे संसर्ग पसरण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी कोणत्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे ते जाणून घेवूयात…

हे लक्षात ठेवा

1 फळं आणि भाज्या धुण्यासाठी साबणाच्या पाण्याचा वापर करू नका.

2 कोमट पाण्याने भाज्या धुण्याचा प्रयत्न करा. पाण्यात थोडंस व्हिनेगर घाला. याचे मिश्रण तयार करून फळं आणि भाज्या साफ करा.

3 व्हिनेगर वापरायचं नसेल तर मीठाच्या वापरही करू शकता. शक्यतो वाहत्या पाण्याचा वापर करा.

4 फळं आणि भाज्या योग्य तापमानात साठवून ठेवा.

दुषित अन्न सेवन केल्याने अन्य बॅक्टेरियामुळे कोरोनाशिवाय इतरही समस्या होऊ शकतात. पोटदुखी, अतिसार, अपचन, उलट्या, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो केल्या पाहिजे.