High BP Control Tips : कोरोना काळात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कशाप्रकारे नियंत्रित करावा BP, सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एका निरोगी व्यक्तीची ब्लड प्रेशर लेव्हल 120/80 एमएमएचजी असते. जर ती 140/90 एमएमएचजी किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर रूग्णाला हाय बीपीचा रूग्ण मानले जाते. हाय ब्लड प्रेशरची समस्या वाढलेले वजन, चुकीची जीवनशैली अशा विविध कारणामुळे होते. हाय ब्लड प्रेशर म्हणजेच हायपरटेंशनची सामान्यपणे कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यास सायलेंट किलर म्हटले जाते. हा आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही सल्ले दिले आहेत जे जाणून घेवूयात…

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचे उपाय

1 संतुलित आजार :
जेवणात कार्बोहायड्रेटची मात्रा कमी करा. तळलेले, मसालेदार पदार्थ कमी करा. मांसाहार, तेल, तूप, बेकरी उत्पादने, जंक फूड, डब्बाबंद पदार्थ सेवन करू नका. पाणी जास्त प्या.

2 मीठाचे सेवन मर्यादित करा :
जेवणात मीठाचे प्रमाण मर्यादित करा. दिवसभरात केवळ 5 ग्रॅम मीठ सेवन करा.

3 वजन कंट्रोल करा :
वजन नियंत्रित करा, वजन वाढल्याने नेहमी ब्लड प्रेशर सुद्धा वाढते.

4 नियमित एक्सरसाइज करा :
ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज 20-25 मिनिटे व्यायाम करावा. 45 मिनिटांपर्यंत वॉक करा.

6 मेडिटेशन आवश्यक :
तणाव कमी करण्यासाठी दररोज मेडिटेशन आवश्य करा. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल राहते.

7 धूम्रपान बंद करा :
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना धूम्रपान आणि दारू नुकसानकारक आहे. यामुळे रक्ताभिसरण वर परिणाम होतो. ही सवय बंद करा.