जाणून घ्या महिलांना नेमक्या कोणत्या वयात गरज असते ‘पौष्टिक’ तत्वांच्या आहाराची, कशी पूर्ण करू शकणार ?

पोलीसनामा ऑनलाईन: आपल्याला अन्न फक्त ऊर्जा देत नाही तर आपली दैनंदिन कार्यक्षमता देखील चांगली करत असते. आपल्या आहारात फळे, भाज्या, धान्य आणि शेंगदाणे अशा विविध खाद्यपदार्थांचा समावेश असतो. व्हिटॅमिन आणि वेगवेगळी खनिजे त्यांच्या सेवनातून आपल्याला मिळत असतात. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराची भिन्न कार्ये करतात. या सर्व पौष्टिक पदार्थांचा आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यात विशेष सहभाग असतो. शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता आहे, तर कॅल्शियम हाडे मजबूत करते. त्याचप्रमाणे जस्त( झिंक) शरीरातील रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

दररोज शरीराला त्याच्या आवश्यक कार्यासाठी विशिष्ट प्रमाणात पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. परंतु वय, लिंग आणि आरोग्याच्या स्थितीत फरक असल्यामुळे पौष्टिक घटकांची गरज देखील भिन्न होत असते. पुरुष आणि स्त्रियांमधील जैविक फरकांमुळे महिलांना अधिक पौष्टिक घटकांची आवश्यकता असते. गर्भधारणा, मासिक पाळी, मेनोपॉजचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत असतो. म्हणून, निरोगी राहण्यासाठी स्त्रियांना विशिष्ट पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.

25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिला

कॅल्शियम-
हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीराच्या योग्य विकासासाठी कॅल्शियम आवश्यक असते. याव्यतिरिक्त, हे स्नायू, मज्जासंस्थांच्या विकासास मदत करून त्यांना मजबूत करत असते. लहानपणी आणि 20 वर्षांच्या वयात हाडांची घनता महत्त्वपूर्ण आहे. 20 वर्षांनंतर, हाडांच्या डिसऑर्डरचा धोका असतो. दुग्धजन्य पदार्थ, सोया आणि मासे हे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते. महिलांना दररोज एक हजार मिलीग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.

व्हिटॅमिन डी-
शरीरातील कॅल्शियम पचवण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यक आहे. त्याशिवाय पुरेसे कॅल्शियम सेवन करणे कठीण होते. व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश. याशिवाय सॅल्मन फिश, तृणधान्ये आणि भेंडीमध्येही पुरेसा व्हिटॅमिन डी मिळतो.

लोह-
मासिक पाळीच्या वेळी महिलांमध्ये लोहाची कमतरता येते.गर्भधारणेत, निरोगी लाल रक्तपेशींची पातळी पुनर्संचयित करण्यासाठी लोह आवश्यक आहे. मासिक पाळीच्या वेळी, लोहाच्या कमतरतेमुळे महिलांचे शरीर फिकट पिवळे आणि कमकुवत होते. मांस, मासे, भोपळा आणि डाळिंब हे त्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी उत्कृष्ट अन्न आहेत.

25-40 वर्षांची महिला
आयोडीन
आयोडीन हे मुलाच्या शारीरिक विकासासाठी दुसरं महत्वाचं आवश्यक खनिज आहे. हे मुलाच्या मेंदूत असामान्य वाढ रोखते. 25-40 वर्षे वयाच्या महिला गर्भवती होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून, त्यांना 150 मायक्रोग्राम आयोडीन खाण्याचा सल्ला देण्यात आला येतो. आयोडीन व्यतिरिक्त, 25-40 वर्षे वयोगटातील महिलांसाठी लोह देखील आवश्यक आहे. 25-50 वर्षे वयोगटातील महिलांना दररोज 18 मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते, तर गर्भवती महिलांना दररोज 27 मिलीग्रामची आवश्यकता असते.

40 वर्षांवरील महिला
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी-
म्हातारपणी हाडांचा झीज सामान्य आहे. म्हणूनच, इजा आणि बदुखापत टाळण्यासाठी व्हिटॅमिन डीसह कॅल्शियमचे सेवन करणे आवश्यक आहे. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दोन्ही हाडे आणि स्नायू संबंधित समस्या टाळण्यास मदत करतात.