Health Tips | रिकाम्यापोटी चुकूनही करू नका ‘ही’ 6 कामे, बिघडू शकतं तुमचं आरोग्य; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Health Tips | निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएटसह वेळेवर जेवण करणे अतिशय गरजेचे आहे. संशोधकांनुसार, वेळेवर न खाल्ल्याने अनेक समस्या होऊ शकतात, ज्या भविष्यात मोठ्या होऊ शकतात. तज्ज्ञांनुसार, योग्यवेळी कोणतीही गोष्टी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते, ज्यामुळे शरीर फिट राहते. अशावेळी सकाळच्या खाण्याचे सुद्धा काही नियम आहेत. सोबतच लक्षात ठेवा की, कोण-कोणती कामे रिकाम्यापोटी करू (Health Tips) नयेत.

ही कामे रिकाम्यापोटी करू नका

1. कॅफीनचे सेवन

बहुतांश लोकांचे डोळे सकाळी एक कप चहासोबतच उघडतात. पण यामुळे किती नुकसान होते याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. रिकाम्यापोटी कॉफी किंवा चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या होते. पुढे जाऊन ही मोठी समस्या होऊ शकते.

2. रिकाम्यापोटी दारू पिणे

संशोधनानुसार रिकाम्यापोटी दारू प्यायल्याने रक्तवाहिन्या खुप रूंद होतात. परिणामी उष्णता, रक्तदाबाची समस्या, फुफ्फुस, यकृत आणि मेंदचे अनेक आजार होऊ शकतात.

3. रिकाम्यापोटी च्युईंगम चघळणे

रिकाम्यापोटी च्युईंगम चावल्याने पचनशक्ती कमजोर होते. पोटाचे आजार होऊ शकतात.

4. रिकाम्यापोटी खरेदी करणे

रिकाम्यापोटी खरेदी करणारे बहुतांश लोक जंक फूड खातात. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

5. भूक असताना वाद घालू नका

भूक लागलेली असताना रागावणे हानीकारक आहे. असे केल्याने शरीरात ब्लड शुगरचा स्तर बिघडतो. बीपीसुद्धा वाढू शकतो.

6. अँटी-इम्फ्लेमेटरी गोळ्यांचा वापर

रिकाम्यापोटी कोणतेही औषध घेणे नुकसानकारक आहे. अँटी इन्फ्लेमेटरी औषधांचे सेवन जर रिकाम्यापोटी केले तर नुकसान होऊ शकते.

 

Web Title : Health Tips | what not to do empty stomach khali pet na karne wale kaam health tips in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | नगर परिषदेचा निलंबित अधिकारी निघाला ‘कुबेर’; 3 फ्लॅट, महागड्या गाड्या, 12 तास सुरु होता छापा

Pune Crime | चुलत भावाचा फोटो ‘डीपी’ला ठेवून तरुणाला 4 लाखांचा ‘गंडा’

Rajiv Gandhi Science City Pimpri | पिंपरी चिंचवडमध्ये साकारणार भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कारनगरी, राज्य सरकारचा निर्णय