Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्त येतेय?; नका करु काळजी, ‘हे’ करा घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या आरोग्याच्या समस्या जाणवत असतात. त्याचबरोबर या दिवसात त्वचेच्याही समस्या (Skin Problems) जाणवत असतात. उन्हाळ्यात चांगली त्वचा खराब बनते. यातच उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्त येणे (Nose Bleeding) ही सर्वांत मोठी समस्या अनेकांना भेडसावत असते. मात्र यामुळे अनेकजण घाबरले असतात. नाकातून येणारे रक्त प्रत्येक वेळी आरोग्यासाठी घातक (Nose Bleeding Harmful To health) असतेच असे नाही. त्यामुळे रक्त आल्यास न घाबरता डोके खाली वाकवून थंड पाणी डोक्यावर टाकावे. असं तज्ज्ञांकडून सांगितले जाते (Health Tips).

 

उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते (Why Does Nose Bleed In Summer) ?
या दिवसात घराबाहेर पडल्यास शरीराचे तापमान वाढून नाकातील छोट्या रक्तकोशिका कॅपिलरीज विस्तारित होऊन नाकातून रक्तस्राव होतो. तसेच, कोरडेपणा, नाक टोचणे, पडल्यामुळे नाकाला दुखापत होणे, ॲस्पिरिनसारख्या औषधांचा प्रमाणापेक्षा अधिक वापर, ॲलर्जी, जंतूसंसर्ग, उच्च रक्तदाब यासारख्या अनेक समस्यांमुळे (Causes Of Nose Bleeding) उन्हाळ्यात नाकातून रक्तस्राव होतो. (Health Tips)

रक्त येऊ नये म्हणून ‘हे’ उपाय करा (Take Measures To Prevent Nose bleeding) –

रक्त येऊ नये याकरिता अधिक उन्हात जाणे टाळावे.

उन्हात उपाशीपोटी जाऊ नये.

मुबलक प्रमाणात पेय पदार्थांचे सेवन करावे.

उन्हाळी सिझन मधील फळांचे सेवन करावे.

पित्त आहार टाळावे.

बाहेर पडताना डोक्यावर टोपी घालावी, कान, नाक, डोळे सुती कपड्याने झाकून घ्यावे.

 

रक्त आल्यावर काय कराल (What To Do When Bleeding Start)?
उन्हात चालत असताना अचानक नाकातून रक्त आल्यास घाबरून न जाता, सावली असलेली जागा पाहून शांतपणे खाली बसावे. नाकातील रक्त घशात जाऊ नये, यासाठी समोरच्या बाजूस थोडे वाकावे आणि नाक ओल्या कपड्याने दाबून धरावे. हे महत्वाचे आहे.

 

दरम्यान, रक्त आल्यास घाबरून न जाता थोडे डोके वाकवून थंड पाणी टाकावे, कांद्याचा 2 थेंब रस नाकपुडीत टाकावे किंवा दुर्वा स्वरसाचे 2 थेंब नाकात टाकावे, बेलाच्या पानांचा रस पाण्यात मिसळून पिल्यानेही फायदा होतो. एकाच नाकपुडीतून रक्तस्राव होत असेल तर ती नाकपुडी दाबून ठेवावी. त्याचबरोबर नाकातून रक्त येत असताना नाकाऐवजी तोंडाने श्वास घ्यावा. नाकाला बर्फ लावून धरावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | why do people suffer from nosebleed during summers how to prevent it

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Tips | वजन कमी करायचंय? ‘हे’ 8 पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खा, होईल फायदा, जाणून घ्या

 

Lung Cure | फुफ्फुसाच्या समस्येचा सामना करत असाल तर वाढू शकतो कार्डियक अरेस्टचा (Cardiac Arrest) धोका; ‘या’ 5 पध्दतीनं बाळगा सावधगिरी, जाणून घ्या

 

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!