Health Tips | हिवाळ्यात या 3 कारणामुळे येतो हार्ट अटॅक, जीव वाचवण्यासाठी अवलंबा या टिप्स

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Tips | हिवाळ्याचा हंगाम (Winter Season) खाणे-पिणे आणि आरोग्यासाठी चांगला असतो, परंतु तो हृदयाचे आजार असलेल्या रूग्णांसाठी समस्या घेऊन येतो. यासाठी हार्ट पेशंटनी आपली जास्त काळजी घेण्याची गरज असते. तज्ज्ञांनी याबाबत काही टिप्स सांगितल्या असून त्या फॉलो करू शकता. (Health Tips)

 

धोका वाढण्याची कारणे
हिवाळ्यात हार्ट पेशंटला जास्त जोखीम असते. यापासून बचाव करण्याची पद्धत सुद्धा रूग्णाच्या स्थिती नुसार ठरवली पाहिजे. हिवाळ्यात हार्ट पेशंटसाठी जोखमीची तीन कारण असतात. (Health Tips)

 

1-बीपी वाढण्याची शक्यता
2-ब्लड शुगर वाढण्याची शक्यता
3-रक्त घट्ट होण्याची शक्यता

हे सुद्धा असू शकते कारण
हिवाळ्यातील कोरड्या हवामानामुळे व्यायामाची कमतरता आणि निष्क्रिय जीवनशैली दिसून येते. पाणी पिण्याचे प्रमाण सुद्धा कमी होते. ज्यामुळे रक्त प्रवाह प्रभावित होतो. या सर्व स्थिती हार्ट अटॅकसाठी खरोखरच जोखीमीच्या आहेत. या काळात हृदय रूग्णांनी इतर दिवसांपेक्षा जास्त काळजी घ्यावी.

 

या गोष्टी लक्षात ठेवा
– बीपी नियंत्रणात ठेवा. नियमित बीपी चेक करा. बीपी असामान्य झाल्यास उशीर न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.

– डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम करा. जेणेकरून रक्तवाहिन्या सक्रिय राहाव्यात आणि हृदयाची धडधड सामान्य ठेवण्यास मदत मिळावी.

– ब्लड शुगर नियंत्रणात (Blood Sugar Control) ठेवा. ती नियमित तपासा. गोड सेवन करे टाळा.

– भरपूर प्रमाणात पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवा.

– कोणतीही किरकोळ लक्षणे किंवा त्रास होत असल्यास दुर्लक्ष करू नका. ईसीजी सारखी तपासणी करून योग्य उपचार करा.

– वायु प्रदूषणापासून दूर रहा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Health Tips | winter heart attacks reasons and how to prevent it

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Garlic | तुम्हाला लसून खुपच आवडतो का? तर व्हा सावध! अति सेवन केल्याने लिव्हरचे होऊ शकते नुकसान

Pizza Burger | पिझ्झा-बर्गरची असेल आवड तर बिघडू शकते पचन, या 4 घरगुती उपायांनी ठिक करा पचनक्रिया

Naresh Mhaske | ‘ठाकरेंकडे जेव्हा सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काही केले नाही’ – नरेश मस्के