ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ पद्धतीने करा मुगडाळीचे सेवन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – डायबिटीजच्या उपचारात डाएटची भूमिका महत्वाची असते. तज्ज्ञांनुसार, डायबिटीजच्या रूग्णांनी फिट राहण्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, व्हिटॅमिन आणि मिनरलयुक्त पदार्थ सेवन केले पाहिजेत. जर तुम्ही सुद्धा डायबिटीजचे रूग्ण असाल तर ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी डाएटमध्ये मुग आवश्य सेवन करा. अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की, मुगडाळीच्या सेवनाने शुगर कंट्रोल करता येऊ शकते, जाणून घेवूयात…

मुगडाळ आरोग्यासाठी एखाद्या वरदान पेक्षा कमी नाही. देशाच्या सर्व भागात याचे सेवन केले जाते. डॉक्टर्स निरोगी राहण्यासाठी रोज मोड आलेली कडधान्य खाण्याचा सल्ला देतात. मुगमध्ये फायबर, प्रोटीन फ्लेवोनॉइड्स, फेनोलिक अ‍ॅसिड, कार्बनिक अ‍ॅसिड, अमीनो अ‍ॅसिड, कार्बोहायड्रेट आणि लिपिड आढळते, जे अनेक आजारात लाभदायक आहे. याच्या सेवनाने डायबिटीज, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबात आराम मिळतो.

डायबिटीजचे फायदे
मुग डाळीत ग्लायसेमिक इंडेक्स खुप कमी असतो. डाएट चार्टनुसार मुगडाळीत 38 ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ग्लायसेमिक इंडेक्समधून कार्बोहायड्रेटमधून किती काळात ग्लुकोज तयार होते हे समजते. मुगडाळ शुगर कंट्रोल करण्यात महत्वाची भूमिका पार पाडते.

असे करा सेवन
डायबिटीजचे रूग्ण ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी मुगडाळ आणि मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन करू शकतात. यासाठी नाचणीची भाकरी आणि मुगडाळ सर्वात उत्तम ठरू शकते. या 100 ग्रॅम पीठात केवळ 0.6 ग्रॅम शुगर असते. सोबतच यामध्ये फॅटची मात्रा खुप कमी असते. उशीराने पचन होत असलेल्या डायबिटीज रूग्णांसाठी हे उपयोगी ठरते. यामुळे शुगर नियंत्रित राहते.