पालकचे सर्व आवश्यक न्यूट्रिशन कायम राखण्यासाठी ‘या’ 5 पद्धीने शिजवा आणि सेवन करा

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक शरीरासाठी सर्व आवश्यक न्यूट्रिशन प्रदान करते. परंतु अनेक चुकीच्या पद्धतीने शिजवल्याने यातील न्यूट्रिशन मोठ्या प्रमाणात कमी होतात. ते कायम राखण्यासाठी कोणत्या पद्धती योग्य आहे ते जाणून घेवूयात…

जाणून घ्या शिजवण्याची योग्य पद्धत

1. स्टीमिंगची योग्य पद्धत :
प्रथम पाणी चांगल्या प्रकारे उकळवून घ्या नंतर यामध्ये मीठ टाका. पालक कापल्यानंतर यामध्ये धुवून टाका आणि झाकून एक मिनिट शिजून द्या. याचा रंग गडद होण्यासाठी तो गाळून ताबडतोब बर्फाच्या पाण्यात टाका. जवळपास 40 सेकंद ते 1 मिनिट राहू द्या. हे वाटून पालक राईस, पालक-पनीर सारख्या पदार्थ बनवू शकता.

2. बनवण्याची पद्धत :
सर्वप्रथम पॅनमध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. नंतर बारीक कापलेला लसूण टाका. यानंतर कापलेला पालक टाका. चमच्याने 30 सेकंद हलवा. झाकून किंवा उघडे ठेवून एक मिनिट शिजवा. अशाप्रकारे पालक सॅलमध्ये वापरू शकता.

3. ग्रिलिंगची योग्य पद्धत :
ग्रिल पॅन हलके गरम करा. आता त्यामध्ये एक मिनिटांपर्यंत ग्रिल करा. यामध्ये ऑलिव्ह ऑईल टाका. मीठाने सीझनिंग करा. दुसर्‍या भाज्या किंवा सॅलेडमध्ये टाकून मिसळा.

4. स्टर-फ्रायची पद्धत :
पॅनमध्ये पालक आणि ऑलिव्ह ऑईल टाका. हे सोया किंवा चिकन नगेट्ससोबत चिमुटभर रेड चिली फ्लेक्स आणि मीठ टाकून खा. यातून 1 मिनिटात भाजी तयार होईल. अशाप्रकारे पालक सूप, नूडल, सलाड आणि ऑमलेटसोबत खाऊ शकता.

5. मायक्रोवेव्हची योग्य पद्धत :
एका मोठ्या बाऊलमध्ये पालक आणि थोडे ऑलिव्ह ऑईल टाकून मायक्रोवेव्ह सेफ लिड किंवा प्लेटमध्ये प्लास्टिक रॅपने कव्हर करा 1-2 मिनिटांपर्यंत ठेवा. पास्ता किंवा सूपसह सर्व करा.

न्यूट्रिशनल व्हॅल्यू
* कॅलरीज : 421
* प्रोटीन: 34.1 ग्राम
* फॅट : 25.8 ग्राम