Immunity Boosting Drink : कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अतिशय उपयोगी टोमॅटो ज्यूस, जाणून घ्या रेसिपी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात इम्यूनिटी मजबूत बनवण्यासाठी टोमॅटो खुप उपयोगी ठरू शकतात. कोरोना पीडितांना यासाठी टोमॅटोचा ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जात आहे. जर तुमची सुद्धा इम्युनिटी कमजोर असेल तर तुम्ही सुद्धा हा ज्यूस सेवन करू शकता. हा ज्यूस इम्यूनिटी वाढवण्यास मदत करेल. शिवाय सर्दी, खोकल्यापासून सुद्धा आराम मिळेल. ज्यूस कसा तयार करायचा, ते जाणून घेवूयात…

टोमॅटोचा ज्यूस बनवण्याची कृती
साहित्य
1 कप पाणी
1 चिमुट मीठ
2 टोमॅटो

बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता त्याचे छोटे-छोटे तुकडे करा आणि ज्यूसरमध्ये टाका. आता ज्यूसरच्या ग्लासात एक कप पाणी टाकून बारी करा. आता एका ग्लासात ते काढून घ्या त्यामध्ये थोडे मीठ टाकून सेवन करा. याची चव वाढवण्यासाठी यामध्ये गरम मसाले सुद्धा टाकू शकता.