गरोदर महिलांसाठी ‘विषा’समान आहे आल्याचा चहा, जाणून घ्या याचे 3 दुष्परिणाम

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गरोदर महिलांनी आल्याचा चहा पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घेतला पाहिजे. तज्ज्ञांनुसार गरोदर महिलांनी दिवसभरात केवळ 1500एमजी आले सेवन केले पाहिजे. यापेक्षा जास्त सेवन केल्यास, गर्भपात होण्याचा धोका वाढतो. यासाठी जास्त प्रमाणात आले किंवा आल्याचा चहा सेवन करू नये.

हे आहेत दुष्परिणाम

1 रक्तदाब कमी होऊ शकतो
अनेक संशोधनात खुलासा झाला आहे की आल्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो, जे उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींसाठी औषधासमान आहे. परंतु, कमी रक्तदाब आणि सामान्य रक्तदाबाच्या लोकांना यामुळे नुकसान होऊ शकते.

2 केस वाढण्यास बाधक
चीनच्या संशोधनात खुलासा झाला आहे की, आल्याच्या सेवनाने केस वाढण्यात अडथळा येतो. लांब केसांसाठी काही उपाय करत असाल, तर आल्याचा चहा अजिबात पिऊ नका.

3 छातीत जळजळ होऊ शकते
अनेक शोधांमध्ये प्रमाणित झाले आहे की, आले अ‍ॅसिड रिफलेक्सला कमी करते. तर, अनेक शोधामध्ये हा सुद्धा खुलासा झाला आहे की, आल्याच्या जास्त सेवनाने छातीत जळजळ सुद्धा होऊ शकते. याच्या सेवनाने पोटात अ‍ॅसिड जास्त उत्सर्जित होते.