कोराना काळात सर्दी-खोकला लवकर बरा करण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याकाळात निरोगी राहणे खुप आवश्यक आहे. अशा स्थितीत हवामानातील बदलामुळे झालेला सर्दी-खोकला आणि फ्लूसुद्धा टेन्शन वाढवतो. या कारणामुळे झालेल्या सर्दी-खोकल्याची चिंता करू नका. घरातच राहून काही टिप्स फॉलो करून सहज आराम मिळू शकतो. जाणून घेवूया हे उपाय…

1 मीठ-पाण्याची वाफ घ्या

जर सर्दी झाली तर मीठ पाण्याची वाफ घ्या. एका भांड्यात पाणी गरम करून घ्या, त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून त्याची वाफ घ्या. यावेळी डोकं झाकून घ्या.

2 हळदीचे दूध प्या

एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा साजूक तूप आणि अर्धा चमचा मध मिसळून रोज प्या. दोन-तीन दिवसात सर्दी-खोकला दूर होईल.

3 व्हिटॅमिन-सी चे सेवन करा

कोरोनापासून बचाव करण्यासाठी डॉक्टर्स व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला देतात. यामुळे इम्यून सिस्टम मजबूत होते.

4 काढ्याचे सेवन करा

तुळशीची पाने, आले, काळीमिरी, मध, सुंठ याचा काढा सेवन केल्याने अनेक आजार दूर राहतात.

5 पाणी जास्त प्या

डॉक्टर्स सुद्धा सर्दीमध्ये जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. यामुळे शरीर हायड्रेट राहते. टॉक्सिन बाहेर पडतात. नारळपाण्याचे सेवन सुद्धा करू शकता.