COVID-19 वरील लसीची 10 हजारपेक्षा जास्त लोकांवर होणार चाचणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळ संपूर्ण जगभरात हाहाकार उडाला आहे. कोरोना विषाणू ही संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरली आहे. शारीरिक अंतर राखून कोरोना पूर्णपणे नष्ट करणे शक्य आहे असे दिसत नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटीश शास्त्रज्ञ वॅक्सिन बनवण्याचे काम करत आहेत. याची चाचणी पुढील टप्प्यात पोहचली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर दहा हजार पेक्षा अधिक लोकांवर याची चाचणी करण्याची तयारी सुरु झाली आहे.

मागील महिन्यात, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रायोगिक लसीच्या प्रभावाची आणि सुरक्षिततेची तपासणी केली. यासाठी एक हजार पेक्षा अधिक लोकांवर चाचण्या करण्यात आल्या. यानंतर वैज्ञानिकांनी घोषणा केली की आता त्यांच्या लसीची चाचणी संपूर्ण यूकेमधील लहान मुले आणि वृद्धासंहीत 10260 लोकांवर करण्याची योजना आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लस विकसित करण्याचे काम करत असलेल्या पथकाचे नेतृत्व करणारे अ‍ॅन्ड्र्यू पोलार्ड यांनी सांगितले की, ते करीत असलेला अभ्यास प्रगतीपथावर आहे आणि आम्ही वृद्धांमध्येही या लसीची चाचणी घेण्यास सुरुवात करणार आहोत. जेणेकरून संपूर्ण लोकसंख्येवर ही लस वापरायची का आणि यापासून लोकांचे बचाव होतो का याची माहिती मिळू शकले.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसमध्ये हानिकारक नसलेल्या चिंपांझी कोल्ड विषाणूचा वापर करण्यात आला आहे. त्यात असे बदल केले गेले आहेत, जेणेकरून शरीर कोरनाशी लढणाऱ्या प्रथिनानं परिपूर्ण होईल. चिनी कंपनी देखील त्याच तंत्रज्ञानावर लस तयार करत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक संभाव्य लस वेगेवगळ्या तंत्रज्ञानासह विकसित केली जात आहे. यामुळे कमीत कमी एका लसीसकडून चांगल्या रिझल्टची अपेक्षा आहे.

You might also like