केसांच्या समस्या दूर करण्यासाठी ‘रामबाण’ आहे मेथी, जाणून घ्या ‘हे’ 3 उपाय

नवी दिल्ली: वृत्तसंस्था – केस अकाली पिकणे आणि गळणे ही अनुवंशिक समस्या आहे. यासोबतच चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली आणि तणाव यामुळे सुद्धा केस अकाली पिकणे आणि गळण्याची समस्या होते. योग्यवेळी याकडे लक्ष न दिल्यास व्यक्तीला टक्कल पडू शकते. या समस्येला एलोपेसिया म्हणतात. असे म्हटले जाते की, भारतात 10 व्यक्तींपैकी दोन व्यक्तींना टक्कलची समस्या जाणवते. अशात केसांची योग्य देखभाल करणे सुद्धा जरूरी आहे. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही मेथीचा उपयोग करून ही समस्या दूर करू शकता. जर तुम्हाला वापरण्याची पद्धत माहित नसेल तर ती जाणून घेवूयात…

असा करा उपाय
1 रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या केसांनुसार मेथी पाण्यात भिजवा. दुसर्‍या दिवशी ती दह्यासोबत चांगली वाटून घ्या. आता ही पेस्ट केसांना लावून एक तास तशीच ठेवा. यानंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. याच्या वापराने केस गळणे थांबते, तसेच डँड्रफसुद्धा दूर होतो.

2 पंचवीस ग्रॅम मेथी चांगली वाटून त्यामध्ये बदामाचे तेल मिसळा. आता ही पेस्ट आपल्या केसांच्या मुळांना लावा. यानंतर हलक्या हातांनी केसांना मालिश करून एक तास केस तसेच ठेवा. एक तासानंतर साध्या पाण्याने केस धुवून घ्या. गळणारे केस कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

3 दोन चमचे मेथीदाणे चांगले वाटून घ्या. आता यामध्ये स्वच्छ पाणी मिसळून पेस्ट बनवा. यानंतर पेस्ट केसांच्या मुळाशी लावून काहीवेळ तसेच ठेवा. आता केस साध्या पाण्याने धुवून घ्या. याच्या वापराने अकाली केस गळण्याच्या समस्येतून आराम मिळू शकतो.