Viral Infection Prevention : ‘हे’ 3 घरगुती उपाय करून तुम्ही करू शकता व्हायरल ‘इन्फेक्शन’वर मात, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – वसंत ऋतू आल्यानंतर वातावरणात बदल झाले आहेत, या वातावरणात व्हायरल इंफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. ज्यामुळे लोकांना सर्दी, खोकला, ताप अशा समस्या भेडसावतात. हे व्हायरल इंफेक्शन कोणालाही होऊ शकते. परंतु ज्यांची प्रतिकार शक्ती कमकुवत असते त्यांना हे आजार होण्यास जास्त वेळ लागत नाही.

जर योग्य वेळी यावर उपचार झाले नाहीत तर याचा प्रभाव एक आठवड्यापर्यंत राहू शकतो.

अनेकदा उपचारानंतर सर्दी, खोकला, ताप यापासून सुटका मिळत नाही. अशा वेळी अनेकदा औषध बदलावी लागतात. परंतु असे असताना देखील हे इंफेक्शन अनेकदा जात नाही. हे इंफेक्शन पळवून लावण्यासाठी मग आयुर्वेदिक औषधांचा वापर केला जातो.

पाणी –
जेव्हा एखादे व्हायरल इंफेक्शन होते तेव्हा दिवसभरात भरपूर पाणी प्या, याचे मुख्य कारण शरीराचे होणारे डिहायड्रेशन असते. भरपूर पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.

तुळशीचा चहा –
आयुर्वेदात तुळशीला अनन्य सामान्य महत्व आहे. याचे सेवन केल्याने सर्दी, खोकला, ताप यापासून आराम मिळतो. जेव्हा कधी कोणतेही व्हायरल इंफेक्शन होईल तेव्हा तुळशीचा चहा किंवा त्याचा काढा पिल्याने लवकर आराम मिळतो. तुम्ही तुमच्या स्वादानुसार तुळशीच्या चहामध्ये लवंग, काळी मिरी, आलं टाकू शकतात.

हळद आणि आलं –
व्हायरल इंफेक्शनमध्ये हळद आणि आलं अत्यंत औषधी ठरते. याचे सेवन केल्याने इंफेक्शन लवकर दूर होते. एक ग्लास पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा आल्याची पावडर मिसळावी. हे मिश्रण मंद अचेवर गरम करु त्याचा काढा तयार करावा, त्यानंतर ते थंड करुन त्याचे सेवन करावे. यामुळे आजार लवकर दूर होईल.