‘स्मरणशक्ती’ वाढवायची असेल तर दररोज ‘इतक्या’ मात्रेत प्यावा डाळिंबाचा ज्यूस, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डाळिंब उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये आढळणारे एक फळ आहे. डाळिंबाची झाडे भारताच्या सर्व भागात सहज दिसून येतात. विशेषत: उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथे ते अधिक आढळतात. डाळिंबाचे फळ लाल रंगाचे असून त्यात शेकडो दाणे असतात. असे मानले जाते की रोमने डाळिंबाचा शोध लावला आहे. त्यावेळी रोमन लोक डाळिंबाला शंभर बिया असणारे सफरचंद म्हणून संबोधत होते. यामध्ये जीवनसत्त्वे-ए, सी, ई, प्रथिने, कर्बोदके, फायबर आणि खनिजे आढळतात, जे आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हींसाठी फायदेशीर ठरतात. डाळिंबाचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते आणि तणाव दूर होतो. अशाच डाळिंबाच्या काही फायद्यांबाबत जाणून घेऊया जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

हाडे मजबूत होतात

जर आपण हाडे मजबूत करण्यासाठी सप्लीमेंट घेत असाल तर येथे सांगावेसे वाटते की आपण आपल्या स्नायूंना बळकट करण्यासाठी डाळिंबाचा वापर करू शकता. यामुळे केवळ हाडेच मजबूत होत नाहीत तर संरक्षण कवच प्रमाणे हाडांचे संरक्षण देखील होते. यामध्ये फ्लेव्होनॉइड्स जास्त प्रमाणात आढळतात. हे शरीरातील कोणत्याही भागात सूज असेल तर त्याविरूद्ध लढा देण्यास सक्षम असते. सूज मुळे कूर्चा/ कार्टिलेज आणि ऑस्टियोआर्थरायटिस होण्याचा धोका वाढतो.

तणाव दूर होतो

डाळिंब शरीरातील ऑक्सीडेटिव्ह ताण कमी करण्यास सक्षम आहे. हे मानसिक विकार दूर करण्यास देखील उपयुक्त असते. क्वीन मार्गारेट युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, डाळिंबाचा रस दररोज सेवन करणार्‍या व्यक्तीच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन निम्न स्तरावर राहतो. अशा परिस्थितीत तुम्हाला तणावापासून दूर रहायचे असेल तर दररोज डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते

कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी डॉक्टर व्हिटॅमिन-सी असलेली फळे आणि भाज्या खाण्याची शिफारस करतात. व्हिटॅमिन-सी अँटीबॉडीजला बूस्ट करतात. अँटीबॉडीज रोगांशी लढून शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे आपण आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकता.

पाचक प्रणाली मजबूत होते

डाळिंबामध्ये फायबर अधिक प्रमाणात असतात जे पाचक प्रणाली मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. म्हणूनच, कोरोना काळात शरीर व मनाने निरोगी राहण्यासाठी डाळिंबाचे दररोज सेवन करावे.

स्मरणशक्ती वाढते

Evidence-Based Complementary and Alternative Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, केवळ दोन ग्रॅम डाळिंबाच्या रसाने स्मरणशक्ती वाढवता येते. एका अन्य संशोधनात असे आढळले आहे की 250 मिलीग्राम डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि दिसण्याची शक्ती वाढते.