वेगानं वजन कमी करायचं असेल तर फॉलो करा ‘हा’ सोपा आणि अचूक मार्ग, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने महिला आणि पुरुषांच्या सरासरी वजनावर संशोधन केले आहे. 2010 मध्ये भारतीय पुरुष आणि स्त्रियांचे सरासरी वजन अनुक्रमे 60 किलो आणि 50 किलो होते. आता एनआयएनने पुरुषांचे वजन 65 किलो आणि महिलांचे वजन 55 किलो निश्चित केले आहे. जर एखाद्या पुरुष किंवा महिलेचे वजन या पेक्षा जास्त असल्यास ती लठ्ठ आहे. आजकाल खराब दिनचर्या, चुकीचे खाणे आणि तणाव यामुळे प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणामुळे अस्वस्थ आहे. लठ्ठपणा हा एक अनुवांशिक रोग देखील आहे जो पिढ्यान् पिढ्या चालत राहतो.

या विषयावर बरेच संशोधन केले गेले आहे, ज्यात वजन कमी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी दिनचर्या, आहार, विश्रांती आणि तणाव या सर्व तथ्यांकडे संशोधकांनी विशेष लक्ष दिले आहे. यातील एका संशोधनाने हे सिद्ध केले की, वाढते वजन सोप्या मार्गाने देखील कमी केले जाऊ शकते. या साठी संशोधनात सर्वात सोपी आणि तंतोतंत पद्धत वर्णन केली आहे. जर आपणही वजन वाढल्यामुळे त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर आपण हा उपाय करून पाहू शकता. याचा प्रयत्न केल्याने आपल्याला लवकरच लठ्ठपणापासून मुक्तता मिळू शकते. जाणून घेऊया सोपा तो मार्ग …

एका संशोधनात समोर आले आहे की, जर तुम्ही खाण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिले तर वजन कमी होण्यास मदत होते. आपण प्रत्येक वेळी जेवण करताना हे करू शकता. हे भूक कमी आणि कॅलरीज बर्न करण्यात मदत करते. ncbi.nlm.nih.gov वर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्यामुळे भूक कमी होते आणि व्यक्ती सरासरीने कमी खातो. हे वाढते वजन नियंत्रित करू शकते. या संशोधनात 15 प्रौढांचा समावेश होता. यामध्ये 26.4 वर्षे वयोगटातील 8 पुरुष आणि सरासरी वय 23.5 वर्षे वयोगटातील 7 पुरुषांचा समावेश आहे. या संशोधनाचे निकाल समाधानकारक आहेत. या विषयावर अजून बरेच संशोधन केले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही वाढते वजन नियंत्रित करायचे असेल तर प्रत्येक जेवण करण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्या.