भरपूर फायबर असलेल्या गोष्टींचा डाएटमध्ये आवश्य करा समावेश, वेगाने कमी होईल वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न कराव्या लागतात. सोबतच डाएटमध्ये फायबर युक्त वस्तूंचा समावेश केला पाहिजे. जर तुम्ही सुद्धा लठ्ठपणाने त्रस्त असाल तर आपल्या डाएटमध्ये फायबर युक्त वस्तू आवश्य घ्या. फायबर कोणत्या वस्तूंमध्ये आढळते ते जाणून घेवूयात –

1 ओटमील
याच्या सेवनाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील फॅट बर्न होते. भूख कमी लागते.

2 फळे आणि भाज्या
फायबर युक्त ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, ब्रोकोली, क्रेनबेरी, पेरू, सफरचंद इत्यादी फळे आणि भाज्यांचे रोज सेवन करा. यामुळे भूख लवकर लागत नाही, ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. पचनशक्ती वाढते.

3 पपई
यामध्ये फायबरची मात्रा जास्त असते. याच्या सेवनाने लठ्ठपणा कमी करता येऊ शकतो. मात्र, सेवन नियमित आणि संतुलित मात्रेत करावे.

4 ब्राऊन राईस
फायबरच्या सेवनाने भूक लवकर लागत नाही, यासाठी ब्राऊन राईस चांगला पर्याय आहे. तसेच शरीराला सर्व पोषकतत्व सुद्धा मिळतात.