Weight Loss Tips : ‘ओवा-जिर्‍या’चा चहा हा वेगानं वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी, जाणून घ्या पध्दत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   वजन (Weight) कमी करणे तसे खुप अवघड काम असते. यासाठी लोक अनेक उपाय करताना दिसतात. वर्कआऊट आणि आहारावर विशेष लक्ष देतात. इतके करूनही अनेकांना यश येत नाही. सध्याच्या काळात वजन वाढण्याची मुख्य कारणं म्हणजे चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, तणाव आणि काही वाईट सवयी हे आहे. वजन कमी करण्यासाठी ओवा-जिर्‍याचा चहा जास्त लाभदायक ठरू शकतो. याविषयी जाणून घेवूयात…

असा बनवा चहा

एक कप पाण्यात एक-एक चमचा जीरे आणि ओवा टाकून उकळवा आणि सेवन करा. यामध्ये तुम्ही चवीसाठी मध आणि लिंबू सुद्धा टाकू शकता.

काय आहे खासियत

1 जीरे एंजाइम्स शुगर, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सला कमी करतो. यामुळे वजन कमी होते.

2 ओव्यातील थीमल तेलामुळे पचनशक्ती मजबूत होते.

3 थीमल ते अन्नातील पोषकतत्व शोषित करते. तसेच शरीरात टॉक्सिन बाहे टाकते. यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होते.

4 थीमल ऑईल पोटातील निष्क्रिय फॅटल सक्रीय करते आणि कॅलरीज बर्न करण्यात मदत होते.

5 तज्ज्ञांचे असे मत आहे की, ओव्यामुळे एक महिन्यात दोन किलो वजन कमी होऊ शकते. मात्र, यास शास्त्रीय दुजोरा नाही.

6 सकाळी रिकाम्यापोटी ओव्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात 25 ग्रॅम ओवा भिजत घाला. सकाळी याचे सेवन करा. ओवा चावून खा.