Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत तुळशीची पाने, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. डॉक्टर्ससुद्धा बदलत्या हवामानात ताप, सर्दी-खोकल्यात तुळशीच्या पानांचा काढा पिण्याचा सल्ला देतात. याच्या सेवनाने वाढते वजन नियंत्रणात ठेवता येते. वजन वाढण्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर तुळशीची पाने सेवन करू शकता. यामुळे खुप लवकर लठ्ठपणाच्या समस्येतून दिलासा मिळू शकतो. तुळशीची पाने वापरण्याच्या पद्धती जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे

1 लठ्ठपणा कमी होतो

2 तुळशीच्या पानांच्या सेवनाने मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होते.

3 कॅलरीजसुद्धा सुद्धा लवकर बर्न होतात.

4 तुळशीच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर काढले जातात.

5 तुळशीत कॅलरीज खुप कमी आणि उच्च पोषकतत्व आढळतात.

6 बदलत्या हवामानातील ताप, सर्दी, खोकला यावर गुणकारी.

असे तयार करा तुळशीचे पाणी

रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात 8-10 तुळशीची पाने भिजत टाका. दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यानंतर हे पाणी प्या. मात्र, यातील तुळशीची पाने चावू नका, ती गिळून टाका. स्वाद येण्यासाठी या पाण्यात लिंबूचा रस आणि पुदीन्याची पाने टाकू शकता. याची चव चांगली वाटत नसेल तर या पाण्याचा ब्लॅक टी करून प्या. यासाठी एक कप पाण्यात 8-10 तुळशीची पाने टाकून उकळवा. आता चहा गाहून यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. यामुळे वाढणारे वजन कमी होते.