घरी बसून वाढलेलं पोट आणि कंबर होईल झटपट कमी, ’हे’ 6 उपाय करा

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना काळ सुरू झाल्यापासून वर्क फ्रॉम होम वाढले आहे. अनेक लोक कमीत कमी घराच्या बाहेर पडत आहेत. परंतु याचे काही शारीरीक दुष्परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. महिला आणि पुरूष असे दोघांमध्ये हे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट वाढल्याने काहीजणांचे शरीर बेढब दिसू लागले आहे. तुम्हालाही घरी बसल्याने अशी समस्या जाणवत असेल तर तोबडतोब हे उपाय करा, कारण यातून दुसरे आजार उद्भवू शकतात.

हे उपाय करा

1 व्यायाम करा
दररोज व्यायाम दररोज करा. रोज यासाठी 20 ते 30 मिनिटे वेळ दिल्यास शरीर निरोगी ठेवू शकता.

2 झोप घ्या
व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असतं. पूर्ण आणि शांत झोप घ्या. किमान सात ते आठ तासांची झोप घ्या. सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.

3 गरम पाणी
लॉकडाऊनमुळे तुम्ही शरीराला आराम सद्धा देऊ शकता. सकाळी लवकर उठून गरम पाणी प्या.

4 आहार
नाश्ता करताना शरीरास पौष्टिक असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा. जेव्हाही तुम्हाला भूक लागेल तेव्हा एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळाने खात राहा.

5 पाणी प्या
दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते. अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे.

6 गोड टाळा
जास्त कॅलरीज असलेले गोड पदार्थ खाणं टाळा. गोड पदार्थ पौष्टिक असले तरी, पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष ताण देणारे असतात.