केवळ ‘हे’ 4 उपाय करून घरी बसून वाढलेला कमरेचा आणि पोटाचा घेर तात्काळ कमी करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   घरात बसून बसून जर तुमच्या पोटावर, कमरेवर, चरबी जमा होऊ लागली तर यामुळं शरीरही बेढब दिसतं. आज आपण घरबसल्या वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

1) जास्तीत जास्त पाणी प्या – जर तुम्ही योग्य प्रमाणात पाण्याचं सेवन केलं नाही तर तुमची बॉडी डीहायड्रेट होते. यासाठी भरपूर पाणी प्यायला हवं. दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यायला हवं. जास्त पाणी प्यायल्यानं त्वचाही चांगली राहते. याशिवाय पोटवरची चरबी कमी होण्यास मदत होते. जास्तीचं फॅट बर्न करण्यासाठी पाणी पिणं जास्त फायदेशीर ठरतं.

2) जास्त गोड खाऊ नका – जास्त गोड पदार्थांमध्ये कॅलरीजचं प्रमाणही भरपूर असतं. याशिवाय गोड पदार्थ पचायला जड जातात आणि पचनशक्तीवर ताण देतात. त्यामुळं असे पदार्थ खाणं टाळायला हवं. जर तुम्हाला गोड खायची इच्छा झालीच तर प्रमाणात खा. कारण जास्त गोड खाल्लं तर शरीरात मेद किंवा चरबी वाढते. याशिवाय मधुमेहासारखा आजारही होतो.

3) थोड्या थोड्या वेळानं खा – वजन कमी करायचं असेल तर आहारावरही नियंत्रण ठेवायला हवं. एकाच वेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळानं खायला हवं. जर तुमचं वजन कमी होत नसेल तर झोपेच्या वेळा चुकीच्या असण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सकाळी उशीरा उठत असाल तर वजन कमी करण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.

4) व्यायाम करा – व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं खूप आवश्यक असतं. रोज 20-30 मिनिटे व्यायाम करूनही तुम्ही निरोगी राहू शकता. सकाळी उठल्यानंतर गरम पाणी नक्की प्या.