Chest Physiotherapy : श्वास घेण्यास त्रास होत असेल तर चेस्ट फिजियोथेरेपी करा, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना संसर्गाच्या अनेक लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे हे सुद्धा एक प्रमुख लक्षण आहे. श्वास घेण्यास त्रास असणार्‍या रूग्णांसाठी चेस्ट फिजियोथेरेपी सर्वात चांगली आहे. चेस्ट फिजियोथेरेपीचा Chest Physiotherapy थेट संबंध श्वसन प्रक्रियेशी आहे. याद्वारे लोक चेस्ट फिजियोथेरेपीने Chest Physiotherapy फुफ्फुस आणखी मजबूत करून कोरोनाचा सामना सहज करू शकता. फुफ्फुसांची सक्रियता वाढवण्यात चेस्ट फिजियोथेरेपी एक चांगला उपाय आहे. एक ट्रीटमेंट सेशन 20 ते 40 मिनिटे चालते. या थेरेपीच्या मदतीने फुफ्फुसात जमा बलगम आणि कफ कमी केला जाऊ शकतो. चेस्ट फिजियोथेरेपी कशी करावी, त्याचे फायदे कोणते ते जाणून घेवूयात.

Heart Attack : हेल्दी मनुष्याला सुद्धा होऊ शकतो हार्टअटॅक, जाणून घ्या कारणे आणि उपचार

चेस्ट फिजियोथेरेपीचे फायदे :
यामध्ये पॉश्च्युरल ड्रेनेज, चेस्ट परक्यूजन, चेस्ट वायब्रेशन, टर्निंग, डीप ब्रिथिंग एक्सरसाइज सारख्या अनेक थेरेपींचा समावेश आहे. याद्वारे फुफ्फुसात जमा बलगम बाहेर काढण्यास मदत होते. रूग्णाला वेगवेगळ्या पोश्चरमध्ये झोपवून दीर्घ श्वास घेण्यास आणि सोडण्यास सांगितले जाते. रूग्णाची पाठ, छाती आणि बरगड्यांमध्ये थोपटून आणि कंपन उत्पन्न करून फुफ्फुसांमध्ये जमा बलगम बाहेर काढला जातो.

चेस्ट फिजियोथेरेपी कशी करावी :
1 कपिंग आणि वायब्रेशन (2-3 मिनिटे) :
ही आरामशीर झोपून काही आधार घेऊन केली जाते. चेस्टवर ट्रिमरसारख्या माईल्ड डिव्हाईसने व्हायब्रेशन दिले जाते.

2 दिर्घ श्वास घेण्याची एक्सरसाईज (3-4 मिनिटे) :
पहिल्या टप्प्यात आरामशीर आणि दिर्घ श्वासाने बलगम एकत्र करण्यास मदत होते.

3 टफिंग आणि हफिंग टेक्निक्स (5-6 मिनिटे) :
यामुळे फुफ्फुसातून बलगम बाहेर काढण्यास मदत होते. फुफ्फुसातून बलगम बाहेर काढण्यासाठी पोस्टुरल ड्रेनेज असतो. हे नियमित वेळेनंतर पोटावर झोपणे, शरीराच्या साईडला झोपण्याच्या मुद्रेत केले जाते. हे बाकी स्टेप्सच्या 2-3 फेर्‍या केल्यानंतर केले जाते.

थेरेपीशी संबंधी गोष्टी :
* चेस्ट फिजियोथेरेपीसाठी  जेवणाच्या अगोदरची वेळ किंवा जेवणानंतर दिड किंवा दोन तासांची वेळ अनुकूल आहे. या वेळेत उलटी होण्याचा धोका नसतो.
* ही थेरेपी एका सीरीजप्रमाणे सायकल बनवून केली पाहिजे.
* फुफ्फुसांना चांगले करण्यासाठी एका पीरियडमध्ये थेरेपीच्या 2-3 सायकल करण्याची आवश्यकता असते.
* वाफेसह ही थेरेपी केल्याने बलगम आणि स्राव कमी जाऊ शकतो.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी