Claustrophobia- Symptoms And Causes : सुशांत सिंह राजपूत ‘क्लोस्टोफोबिया’नं होता ग्रस्त, जाणून घ्या या आजाराची लक्षणं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतच्या आजाराचा खुलासा करत सांगितले की, सुशांत क्लॉटोफोबियाने पीडित होता. सुशांतला विमानात प्रवास करण्याबाबत भीती वाटायची, लिफ्टमध्ये चढताना सुशांत घाबरायचा. पण सुशांतला अशी भीती का होती, ज्यामुळे तो प्रवासापूर्वी औषध घेत असे. क्लोस्टोफोबिया म्हणजे नक्की काय ? या आजाराची लक्षणे काय आहेत ? चला तर आजाराबद्दल जाणून घेऊया…

काय आहे क्लोस्टोफोबिया?
क्लोस्टोफोबिया एक प्रकारची भीती आहे, एक प्रकारचे एन्गझाईटी डिसऑर्डर आहे, जे कोणत्याही व्यक्तीला होऊ शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जगातील १० टक्के लोक गंभीर क्लोस्टोफोबियाने ग्रस्त आहेत. यापैकी काही लोकच यासाठी उपचार घेतात. क्लोस्टोफोबिया हा शब्द ग्रीक शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ एक बंद ठिकाण आहे. IPSYCOM च्या अहवालानुसार, नॅशनल सेंटर फॉर ट्रीटमेंट ऑफ फोबियाच्या संचालकांनी सांगितले आहे की, क्लोस्टोफोबिया हा सर्वात सामान्य मानसिक आजारापैकी एक आहे. या आजाराने ग्रस्त लोकांना बंद ठिकाणी किंवा छोट्या ठिकाणी गेल्यावर गुदमरल्यासारखे वाटते. काही लोकांना तर प्रत्येक जागेची भीती वाटते. त्यांना वाटते की, त्या ठिकाणी त्यांचा श्वास बंद होईल.

क्लोस्टोफोबियाची लक्षणे
भीती आणि थरथरणे
श्वास घेताना अडचण जाणवणे, श्वास थांबल्यासारखे वाटणे.
छातीजवळ घट्टपणा किंवा अडकल्यासारखे वाटणे
छातीचे ठोके वेगाने वाढणे
अस्वस्थ वाटणे
डोकेदुखी आणि चक्कर येणे

क्लोस्टोफोबियाने ग्रस्त व्यक्तीला प्रत्येक बंद जागी भीती वाटते. मेट्रो, बोगदा, छोटी जागा, लिफ्ट, बाथरूममध्ये अंघोळ करताना भीती वाटते. या आजाराने ग्रस्त लोक लिफ्टऐवजी पायर्‍या वापरणे पसंत करतात. लोक खोलीतच राहतील, पण या आजाराने ग्रस्त व्यक्तीला खोलीच्या बाहेर मोकळे राहण्यास आवडते. क्लोस्टोफोबिया खरंतर लहानपणातील एखाद्या दुःखद अनुभवाचा परिणाम आहे, ज्याचा परिणाम बराच काळ राहतो. या आजाराची अनेक कारणे आहेत, जसे की लहानपणी एखाद्या खड्ड्यात पडणे, पालकांसह जाताना कुठेतरी हरवणे अशा प्रकारचे दुःखद अनुभव मुलांमध्ये लहानपणापासूनच घर करतात, जे त्यांना तरुणपणातही त्रास देतात.

उपचार
क्लोस्टोफोबियासाठी उपचार प्रामुख्याने उपचारात्मक आहेत. या आजाराचा उपचार करण्यासाठी संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (सीबीटी) वापरली जाते.