वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे धोक्याची घंटा, जाणून घ्या गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल, ‘या’ 5 पद्धतीनं ठेवा बॅलन्स

 पोलीसनामा ऑनलाइन – शरीरारात लिव्हरद्वारे निर्मित मेण किंवा चरबीसारख्या पदार्थालाच कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड म्हणतात. विविध कार्य करण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कोलेस्ट्रॉल शरीरात असणे आवश्यक असते. पेशीचे आवरण, व्हिटॅमिन डी, पचनशक्ती आणि अनेक प्रकारचे हार्मोन्स जसे की – एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, कोर्टिसोल आणि एल्डोस्टेरॉनच्या निर्मितीसाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. याशिवाय बाइल सॉल्ट (पित्तक्षार) मध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल असतात, जे फॅट योग्यप्रकारे पचन करण्यात मदत करतात. सोबतच कोलेस्ट्रॉल व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के शरीरात शोषित करण्यास सुद्धा मदत करते. सूर्यप्रकाशात शरीरात कोलेस्ट्रॉलच्या मदतीने व्हिटॅमिन डी चे उत्पादन होते.

कोलेस्ट्रॉल रक्तात प्रोटीन आणि लिपिडने बनलेल्या रचनात्मक द्रवाचे रूपात असते आणि कोलेस्ट्रॉल आणि प्रोटीन युक्त याच तत्वाला लिपोप्रोटीन म्हणतात. लिप्रोप्रोटीन्स कोलेस्ट्रॉलला रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागात पोहचवण्यास मदत करतात. लिपोप्रोटीन्स प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात :

1. हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) कोलेस्ट्रॉल
या प्रकारच्या लिपोप्रोटीनमध्ये फॅटच्या तुलनेत प्रोटीन जास्त असते. यास गुड किंवा चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. एचडीएल कोलेस्ट्रॉलचा उच्च स्तर तुमच्या हृदयासाठी लाभदायक आणि सुरक्षित ठरतो. शरीरात एचडीएल कोलेस्ट्रॉल अधिक असतील तर हृदयाच्या आजाराचा धोका कमी असतो.

2. लो डेंसिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) कोलेस्ट्रॉल
या लिपोप्रोटीनमध्ये प्रोटीनच्या तुलनेत फॅटची मात्रा जास्त असते आणि यासाठी यास बॅड किंवा खराब कोलेस्ट्रॉल म्हणतात. जर शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉलचा स्तर जास्त असेल तर हृदयरोगाचा धोका वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास छातीत वेदना, हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा डायबिटीज होण्याचा धोका वाढतो.

कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे
1 चुकीचा आहार
2 असक्रिय जीवनशैली
3 धूम्रपान करणे
4 आजार

कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे उपाय

1 जीवनशैलीत बदल करा.

2 या गोष्टी सेवन करू नका : सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ, मीट, अंडे, प्रोसेस्ड फूड, तळलेले पदार्थ, साखार, डेअरी प्रॉडक्ट्स इत्यादी जास्त खाऊ नये.

3 हे जास्त सेवन करा : लो-फॅट किंवा स्किम्ड मिल्क, वेजिटेबल ऑईल वापरा, कडधान्य, मासे, सुकामेवा, फळ आणि भाज्या, चिकन. फायबर असलेल्या वस्तू.

4 दिवसभर सक्रिय राहा, व्यायाम करा.

5 वजन नियंत्रणात ठेवा.