‘सेक्स हॉर्मोन टेस्ट’ माहित आहे का ? ‘ही’ 8 लक्षणे आढळली तर जरूर करा चाचणी

पोलिसनामा ऑनलाइन – सेक्स हॉर्मोन टेस्ट शरीरात प्रजनन तंत्राशी संबंधीत टेस्ट आहे, ज्याद्वारे एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन आणि टेस्टोस्टेरोन हॉर्मोनचा शोध घेतला जातो. टेस्टोस्टेरोन हॉर्मोन महिला आणि पुरुष, दोघांमध्ये आढळतात, जे गुप्तांग विकसित करण्याचे काम करतात. तर एस्ट्रोजन सुद्धा एक सेक्स हार्मोन्स आहे, जे महिलांच्या ओवरी (योनी) द्वारे बनवले जाते. हे काही प्रमाणात पुरूषांच्या एड्रिनल ग्रंथीद्वारे सुद्धा बनवले जाते. तर प्रोजेस्टेरोन हॉर्मोन केवळ महिलांमध्ये आढळते. या सर्व हार्मोनच्या निर्मितीमध्ये काही गडबड झाली तर व्यक्तीच्या सेक्स लाइफवर प्रभाव होतो. या स्थितीत सेक्स हॉर्मोन टेस्ट जरूर केली पाहिजे. सेक्स हॉर्मोन टेस्ट काय असते ते जाणून घेवूयात…

ही लक्षणे आढळली तर करा टेस्ट

1 महिला किंवा पुरूषांमध्ये सेक्सची रूची नसणे
2 पिट्यूटरी ग्रंथीमध्ये हॉर्मोन संबंधी काही दोष असेल
3 ओवरीमध्ये कँसर
4 गुप्तांग वयानुसार विकसित नसणे
5 पुरूषांमध्ये कधी-कधी असामान्यपणे स्तन वाढणे
6 महिलांमध्ये मासिकपाळी सुरू न होणे
7 नपुंसकता सारखी समस्या असणे
8 वारंवार गर्भपात होणे

टेस्टपूवी घ्या ही काळजी

1 सोबत आपल्या जवळच्या व्यक्तीला घेऊन जा
2 टेस्टपूर्वी काहीतरी खाऊन जा
3 काही औषधं घेत असाल तर डॉक्टरांना तसे सांगा