Testing for COVID-19 : लक्षणं दिसत नसली तरी कोविड टेस्ट करा, जाणून घ्या कधी-कधी करावी टेस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसची ही दुसरी लाट अत्यंत धोकादायक असल्याचे दिसले आहे. कोरोनाच्या भीतीने अजूनही अनेक लोक टेस्ट करायला घाबरत आहेत. पण या व्हायरसपासून वाचायचे असल्याचे सतर्क राहणे गरजेचे आहे.

कोरोनाचे बदलते रुप आणि त्याच्या लक्षणांविषयी सर्वांनाच माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हा कोणाला ही लक्षणे जाणवतील तेव्हा आपण स्वत:ला आयसोलेट करणे गरजेचे आहे. असे केल्यास कोरोनाची साखळी रोखू शकतो. पण तुम्हालाही कधी लक्षणे जाणवल्यास घाबरून जाऊ नका. तातडीने टेस्ट करावी. तुमच्यात लक्षणे असणे गरजेचे नाही. तरीही तुम्ही कोरोना टेस्ट करू शकता.

तर जाणून घेऊ कोरोना टेस्ट कधी-कधी करणे गरजेचे…
जर तुम्हाला खोकला, ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे असल्यास…

तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आले असल्यास पण लक्षणे नसतील तरीही टेस्ट करावी…

– जर तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणे असतील तर 1-2 दिवसांत RT-PCR टेस्ट किंवा अँटिजेन रॅपिड टेस्ट करावी

जर RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली आणि लक्षणे दिसतील तर 1-2 दिवसांत पुन्हा टेस्ट करावी

तसेच जर रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आली तर RT-PCR टेस्ट तातडीने करावी

जर तुमच्यात लक्षणे नसतील तेव्हा तुम्ही स्वत: आयसोलेट केल्याच्या 5-7 दिवसानंतर RT-PCR टेस्ट करावी

लक्षणे आहेत आणि RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा 5-7 दिवसांत सीटी स्कॅन करावा

डबल लेअरचा मास्क वापरावा. दुसऱ्यांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि सातत्याने हँडवॉश करावा.