Required Test After Isolation : आयसोलेशनच्या नंतर कोण-कोणत्या टेस्ट करणे आवश्यक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना संसर्गाच्या या काळात जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये उपचार करत असाल तर डॉक्टरांकडून वेळोवळी सल्ला घेणे आवश्यक आहे, सोबतच काही टेस्ट करणे आवश्यक आहे जेणेकरून कोरोनानंतर शरीरात झालेल्या नुकसानीचा अंदाज घेता येऊ शकतो. होम आयसोलेशननंतर कोण-कोणत्या टेस्ट कराव्यात ते जाणून घेवूयात…

CBC : शरीरातील हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, डब्ल्यूबीसीची स्थिती जाणून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते. आयसोलेशननंतर सुद्धा ताप आणि खोकला येत असेल तर ही टेस्ट करा.

CRP : शरीरातील इन्फेक्शनचा शोध घेण्यासाठी ही टेस्ट आवश्यक आहे. ज्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे परंतु त्यानंतर सुद्धा सतत खोकला आणि डोकेदुखीची तक्रार असेल तर ही टेस्ट आवश्य करा.

D-Dimer : रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या स्थितीत ही टेस्ट केली जाते.

LDH : या टेस्टच्या मदतीने शरीरात टिशू लॉसबाबत शोध घेतला जातो. कोरोनाची गंभीर आणि हलकी लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये इन्फेक्शन आल्याच्या 4-7 दिवसानंतर ही टेस्ट करावी. जर रूग्णाला ताप 7 दिवसानंतर सुद्धा असेल तर 12-14 दिवसादरम्यान ही टेस्ट केली जाते.

SEROTONIN TEST : ही टेस्ट शरीरात तयार होणार्‍या ट्यूमर्सबाबत सांगते.

KFT : किडनीची स्थिती जाणून घेण्यासाठी ही टेस्ट करू शकता. यातून क्रिएटिनिन आणि यूरियाचा स्तर समजतो.

LFT : लिव्हर फंक्शन टेस्टने कोरोनानंतर लीव्हरला झालेल्या नुकसानीची शोध घेता येतो.

URINE ROUTINE CULTURE : ज्या रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा युरीनचा त्रास होत आहे त्यांना युरीन टेस्ट करण्यास सांगितले जाते.

LGM FOR ENTERIC FEVER : कोरोनानंतर जर जेवण पचनण्यास त्रास होत असेल तर ही टेस्ट केली जाते. हलका ताप आयसोलेशन संपल्यानंतर सुद्धा येतो.