Coronavirus 2nd Wave : ‘कोविड’च्या रूग्णांसाठी कशामुळं संसर्गाचा 5 वा अन् 10 वा दिवस असतो महत्वाचा?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस महामारीच्या दुसर्‍या लाटेत आजराबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत, ज्यामुळे याबाबत अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. कोविड-19 ची बहुतांश प्रकरणे होम आयसोलेशन करून 14 दिवसात ठिक होतात. मात्र, अनेक हलकी प्रकरणे सुद्धा 5व्या ते 10व्या दिवसादरम्यान गंभीर होतात.

लोक हलकी प्रकरणे घरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. जे योग्य सुद्धा आहे, कारण जर सॅच्युरेशन स्तर आणि अन्य गोष्टी ठिक आहेत, तर हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे कारण नाही. विशेषकरून जेव्हा सर्व हॉस्पिटल रूग्णांनी भरलेली आहेत.

परंतु, ते लोक ज्यांना हलका संसर्ग आहे किंवा असिम्टोमॅटिक आहे, त्यांनी सुद्धा आपल्या लक्षणांवर लक्ष ठेवले पाहिजे. डॉक्टरांनुसार, या संसर्गाचे खरे रूप 5व्या ते 10 व्या दिवशी पहायला मिळते. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, 14 दिवसांच्या आयसोलेशनच्या दरम्यान हे स्पष्ट होते की, संसर्ग किती गंभीर आहे.

5 व्या ते 10 व्या दिवशी संसर्ग का बिघडतो?
कोविड-19 चा आजार आणि रिकव्हरीच्या 14 दिवसांच्या कालावधीला तीन भागात विभागता येऊ शकते. 1-4 दिवस, 5 वा ते 10 वा दिवस आणि 11 वा ते 14 वा दिवस लक्षणे दिसल्यानंतर सुरूवातीचे दिवस प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असू शकतात, या दरम्यान वायरल संसर्गाची रिअ‍ॅक्शन पहायला मिळते. मात्र, या आजाराच्या दरम्यान 6व्या आणि 7 व्या दिवशी काही लोकांची इम्यून सिस्टम गरजेपेक्षा जास्त काम करते आणि संसर्गाला मुळापासून नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीजचे उत्पादन करते. ज्यामुळे शरीरात द्रव पदार्थ आणि सूज ची लाट आल्यासारखे होते. अनेक लोकांसाठी आजाराशी खरी लढाई यावेळी सुरूहोते. अचानक, जो आजार पहिल्या आठवड्यात बरा होताना दिसत होता, तो अचानक गंभीर होऊ लागतो, ज्यामुळे सर्व हैराण होतात.

या लक्षणांकडे लक्ष देणे खुप आवश्यक
काही इशार्‍याचे संकेत आवश्य दिसतात, ज्यातून एखाद्याला जाणवते की, ही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आणि व्यक्तिगत प्रकारे उपचार घेण्याची वेळ आहे. ऑक्सीजनचा स्तर कमी होऊ लागतो, बेशुद्ध पडणे, जास्त ताप, औषध घेऊनही ताप न उतरणे, श्वास घेण्यास त्रास, अस्वस्थता, जडपणा इत्यादी संकेत दिसतात. आजाराच्या दुसर्‍या आठवड्यात काही रूग्णांमध्ये हायपोक्सिया, जी एक गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये ऑक्सीजनचा स्तर कोणत्याही लक्षणांशिवाय कमी होऊ लागतो. ज्या रूग्णांना अगोदर हाय-कोलेस्ट्रॉल, डायबिटीज़, लठ्ठपणा, इत्यादी समस्या आहेत त्यांना हा त्रास जास्त होऊ शकतो.