जाणून घ्या खाल्ल्यानंतर आंघोळ का करू नये, कशाप्रकारे होते शरीराचे नुकसान

नवी दिल्ली : आधुनिक काळात लोकांची जीवनशैली बदलली आहे. अगोदर लोक ठराविक वेळी आपली कामे करत असत, परंतु सध्या कोणतेही काम वेळेवर केले जात नाही. ज्येष्ठ लोक नेहमी सांगतात की, निरोगी राहण्यासाठी प्रत्येक काम वेळेवर केले पाहिजे. मात्र, लोक त्यांच्या सल्ल्याकडे कानाडोळा करतात. चुकीच्यावेळी काही कामे केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जर तुम्ही सुद्धा तुमची कामे ठराविक वेळी करत नसाल तर ही सवय बदलावी लागेल. खाण्या-पिण्यानंतर ताबडतोब का आंघोळ करू नये, आणि त्यामुळे कोणते नुकसान होते ते जाणून घेवूयात…

आयुर्वेदानुसार, खाल्ल्यानंतर ताबडतोब आंघोळ केल्याने हात, पाय आणि शरीरात रक्ताभिसरण वाढते. तर पोटात रक्ताभिसरण कमी होऊ लागते. यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. अपचन आणि पचनसंबंधी समस्या उत्पन्न होतात.

ही आहेत कारणे

1 खाल्ल्यानंतर शरीरात अग्नि तत्व सक्रिय होते, ज्यामुळे खाणे लवकर पचते. मात्र, खाल्ल्यानंतर ताबडतोब आंघोळ केल्याने पोटाचे तापमान कमी होते. यामुळे जेवण लवकर पचन होत नाही.

2 आधुनिक विज्ञानानुसार जेवल्यानंतर अग्नाशयातून पेप्सिन एंजाइम निघते, जे जेवण पचवण्याचे काम करते, परंतु जेवल्यानंतर तोबडतोब आंघोळ केल्याने पोटाचे तापमान कमी होऊ लागते, ज्यामुळे रक्तप्रवाह पोटाशिवाय इतर शरीरात होऊ लागतो. या प्रक्रियेमुळे जेवण पचन होण्याची प्रक्रिया मंदावते.

हे लक्षात ठेवा
कधीही जेवण केल्यानंतर ताबडतोब आंघोळ करू नये. शक्य असल्यास रोज प्रत्येक काम ठराविक वेळी करा.