घरात की घराबाहेर, कुठं वर्कआउट करणे योग्य? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  व्यायाम हा शरीरासाठी अत्यंत फायद्याचा असतो. त्याने शरीर सदृढ राहते म्हणून डॉक्टरांकडूनही नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. व्यायाम हा फक्त ज्येष्ठ किंवा मध्यमवयीन लोकांसाठी नाहीतर सर्वच वयोगटातील लोकांना गरजेचा आहे.

आज आपण इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही प्रकारचे व्यायामाचे फायदे-तोटे काय आहेत याची माहिती घेणार आहोत…

आउटडोअर व्यायामाचे फायदे

–  आवश्यक प्रमाणात ‘व्हिटॅमिन डी’ची मात्रा असते.

–  आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटी मग सायकलिंग असो, वॉक किंवा जॉगिंग प्रॉपर एक्सरसाईज केल्याने मनाला आनंद आणि शांती मिळते. तुमचा मूडही ठीक राहतो.

आउटडोअर व्यायामाचे तोटे काय?

–  प्रदूषणाची पातळी वाढल्याने आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटीज केल्याने अनेक अडचणी येतात. ज्यांना पहिल्यापासूनच गंभीर समस्यांनी ग्रासले आहे, अशांना याचा त्रास होऊ शकतो.

–  सध्या कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामध्ये बाहेर जाऊन अ‍ॅक्टिव्हिटी केल्याने याचे नुकसान होऊ शकते.

–  उन्हाळा, पावसाळा पाहता आउटडोअर अ‍ॅक्टिव्हिटी करण्यात अडचणी येऊ शकतात.

इनडोअर व्यायामाचे फायदे

–  व्हायरसच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी

–  इनडोअर वर्कआउटला कंफर्टनुसार सकाळ, दुपार किंवा सायंकाळी कधीही केले जाऊ शकते.

इनडोअर व्यायामाचे तोटे काय?

–  घरात जर तुम्ही एकटे असाल तेव्हाच वर्कआउट करू शकता.

–  घरात वर्कआउट केल्यानंतर शरीरात आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळत नाही. त्यामुळे हाडांची समस्या उद्भवू शकते.