Nutrients For Women : निरोग आणि एकदम तंदुरुस्त राहण्यासाठी महिलांनी आहारात ‘या’ 5 पोषकतत्वांचा करावा समावेश, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कुटुंबाची सर्व जबाबदारी महिलांच्या खांद्यावर असते. शिवाय महिला नोकरी किंवा व्यवसाय करणारी असेल तर तिचा भार आणखी वाढलेला असतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांना प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम सारख्या पोषणतत्वांची आवश्यकता असते. महिलांना कोणत्या खास पोषकतत्वांची सर्वात जास्त आवश्यकता असते आणि त्यांची कमतरता कशी पूर्ण करावी ते जाणून घेवूयात…

आयर्न महिलांसाठी सर्वात मोठी गरज :
महिलांमध्ये आयर्नची कमतरता सर्वात जास्त असते. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी पालक, तांदूळ, किडनी बीन्स, टोमॅटो, ब्रोकली, अंजीर, आक्रोड, बदाम-काजू, मनुके, खजूर आणि सफेद चन्यांचे सेवन करावे.

फायबरचा समावेश करा :
19 ते 50 वयोगटातील महिलांना 25 ग्रॅम फायबर रोज हवे असते. फायबरसाठी सफरचंद, अक्रोड, ब्राऊन राईस, पालक, स्वीटकॉर्न, ब्रोकली, गाजर सेवन करा.

प्रोटीन अतिशय आवश्यक :
महिलांना एका दिवसात किमान 45 ग्रॅम प्रोटीन आवश्यक असते. यामुळे हाडे मजबूत होतात, अनेक आजार दूर राहतात. याच्यासाठी चिकन, रेड मीट, मासे, काजू आणि बदाम सेवन करा.

व्हिटॅमिन्स सुद्धा गरजेचे :
व्हिटॅमिनसाठी महिलांनी लाल सिमला मिरची, पेरू, संत्रे, ब्रोकली आणि स्ट्रॉबेरीचे सेवन करावे. अंडे, टूना फिश आणि कॅटफिश सेवन करावे.

फोलिक अ‍ॅसिड :
पीरियडच्या दरम्यान महिलांना फोलिक अ‍ॅसिडची सर्वात जास्त गरज असते. डिप्रेशन आणि मायग्रेनसारख्या समस्यांपासून हे वाचवते. यासाठी हिरव्या पालेभाज्या, एवोकाडो, ड्राय बीन्स, नट्स, मटर, ब्रोकली, आंबट फळे, डाळींचे सेवन करावे.