Neem benefits : रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते त्वचेच्या रोगांवरील उपचारासाठी अत्यंत उपयुक्त कडूलिंबू, जाणून घ्या फायदे

पोलीसनामा ऑनलाइन – ॲण्टीबायोटिक तत्वांनी समृध्द असलेले कडूलिंब शतकानुशतके सर्वोत्कृष्ट औषध म्हणून वापरले जात आहे. त्याची चव भलेही कडू आहे, परंतु त्याचे फायदे अनेक आहेत. कडुलिंबाचा वापर शेकडो औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो. कडूलिंब विषावर देखील प्रभावी आहे. एखादा विषारी प्राणी चावल्यास कडुनिंबाची पाने बारीक करुन त्यावर लावल्याने विष पसरत नाही. जर खाज सुटणे आणि जखमा जास्त असतील तर कडुनिंब पाण्यात उकळवून आंघोळ केल्यास खाजपासून आराम मिळतो. कडुलिंबाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी प्रभावी आहे. आपल्या बर्‍याच समस्या दूर करण्यात कडूलिंब प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया की, कडुनिंब रोगांवर उपचार कसे करते.

त्वचेवर आग झाल्यावर कडूलिंबाने उपचार करा
जर स्वयंपाक करताना आपला हात भाजला असेल तर काळजी करू नका, कडुलिंबाची पाने बारीक करून ताबडतोब भाजलेल्या जागी लावल्यास त्वचा थंड होईल.

जर तुमच्या कानात जखम झाली असेल तर कडुनिंबाचा वापर करा
जर कानात कोणत्याही प्रकारची वेदना होत असेल तर कडुनिंबाचा रस आणि मध मिसळून जखमेच्या जागी लावल्यास दुखण्यापासून आराम मिळेल.

तसेच दातदुखीसाठी फायदेशीर आहे
दातदुखीपासून मुक्त होण्यासाठी कडुनिंब आणि लिंबू हे अतिशय प्रभावी उपचार आहेत. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात लिंबाचा रस घालून पेस्ट बनवून दातांवर लावा. या पेस्टमुळे तुम्हाला दातदुखीपासून आराम मिळेल.

कडुनिंब केसांसाठीही फायदेशीर आहे
जर स्काल्पवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन किंवा कोंड असल्यास, कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर आपले डोके धुवा. स्काल्प संबंधित समस्येपासून मुक्तता मिळेल

कडूलिंबामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुनिंबाची पाने क्रश करा आणि एक ग्लास पाण्यासोबत प्या. तुमची रोगप्रतिकारक शक्ती ठीक राहिल.